marathi blog vishva

सोमवार, १२ जुलै, २०१०

निर्भीड-१०
लेवा-ब्राह्मणी नेमाडे पंथ
आजकाल "जात" आपण अभिमानाने वागवू शकतो. ती जात नाही तोवर नोंदवू शकतो, नांदवू शकतो, निंदवू शकतो ! अर्थात ब्राह्मणांना ती लपवून बाळगावी लागते. तेव्हा सुरुवातीलाच भालचंद्र नेमाडे हे लेवा पाटील समाजातले आहेत, हे त्यांच्याच समाजाच्या संकेतस्थळावरून कळते, तेव्हा ते ब्राह्मणांवर का तोंडसुख घेत आहेत हे पटकन कळायला मदत होते. वर्णव्यवस्थेवर टीका करताना ती वाईट असून हिंदू धर्मातून जावी असे म्हणता म्हणता इतर जातींना, निदान ती जात नाही तोवर तरी, ब्राह्मणांचे स्थान आपल्याला मिळावे असे सूप्त धोरण असते. म्हणूनच तर जातीव्यवस्थेचे निर्मूलन मागण्या ऐवजी प्रत्येक जात ब्राह्मणासारखे आपल्याला "आरक्षण" मिळावे अशी मागणी करते. आता तर मराठे सुद्धा आरक्षण मागत आहेत. म्हणजे असंतुलन जातीव्यवस्थेत हवेच आहे. म्हणजे प्रत्येक जातीला ब्राह्मण जातीचा आरक्षित दर्जा वा मेवा हवा आहे. ह्यात कोणा समाजशास्त्र्यांना वाईट वाटण्याचे कारण नसावे, कारण हे फक्त जातीच्या रहाट-गाडग्याचे झोके घेणे आहे. व तसे रास्तच म्हणायला हवे.
असेच रहाट-गाडगे फिरून मूळ-पदावर येते ते "लेखकाचा लेखकराव कसा होतो" ह्या भालचंद्र नेमाडेंच्या लेखाचे. वा.ल.कुलकर्णी चालवीत तो "कंपू", नेमाडे, शहाणे, चित्रे ह्यांची मात्र "मांदियाळी" ! वा.ल.च्या गॅंगने केले ते स्वत:च्या लौकिक फायद्याचे "उद्योग" व नेमाडे करतात ती ( इंग्रजी प्राध्यापकाची ) मराठीची तळमळ, वा.लं.चा कंपू लावे ती पुस्तके म्हणजे धंदा, व नेमाडे तीस वर्षानंतर करतात ती "हिंदु"त्वाची समृद्ध अडगळ, लोकांनी आपल्या पुस्तकासाठी केलेला तो "व्यापार", तर नेमाडे देतात ती विस्तृत मुलाखत, ती मराठीला दिलेली देशी "देणगी" ! सिमल्या सारख्या थंड हवेत निरनिराळ्या भाषात होतात ती नेमाडे प्रतिभेची भाषांतरे, तर साधना करते ते आंतर-भारतीचे प्रयत्न म्हणजे साने गुरुजींच्या अपात्र चेल्यांच्या लीला !लेवा पाटील असलेल्या नेमाडेंना ब्राह्मण होते त्या वा.लं. ची जात हवी आहे हे किती स्पष्ट दिसते पहा !
असेच आहे "हिंदू"चे ! आजकाल प्रमाण-मराठीचे दिवस भरलेत, ती कोणी वाचीत नाही, आणि हेच आपले गिर्‍हाईक आहे तर भाषा निवडणे आली "बोली" ( बाझौऊन ), टीका स्वयंवराला स्थळ लाभत नाही, एक नाड येते, तर लिहा कादंबरी, तीही जाडजूड, व मालीका वाली ! यच्चयावत लेखकांना दोषून झाले, तर आता कोणावर प्रहार करायचा तर मोघम "हिंदू"वर ! प्रत्यक्षात कोणी प्राध्यापकाने विद्यार्थ्यास गळा पकडून मारले तर सिमला काय कुठेही गहजबच माजेल. मग त्याची करा आत्मवृत्त पर कादंबरी "बिढार" सारखी व चालवा आपले बिर्‍हाड ! इस्लाम वर टीका करायची म्हणजे काही खायचे काम नाही. फतव्यांची टांगती तलवार सारखी टाळावी लागते. हिंदू धर्म तसा सगळ्यात जुना व सार्‍यांनी कोरडे ओढलेला. सतीची चाल, वर्णव्यवस्था, ब्राह्मणांचे वर्चस्व, एक ना हजार बाबी टीकेच्या. हा धर्म कसा बिनधोक, कुणीही यावे, टपली मारोनी जावे. आणि हे सर्व सोयीस्करपणे, सरकारी अकादमींच्या समृद्ध अडगळीं आडून !
लेवा-ब्राह्मणी नेमाडे पंथ आता किती सुरेख दिसतो आहे, अगदी नेमाडपंथी दीपमाळे सारखा !

अरुण अनंत भालेराव
भ्र: ९३२४६८२७९२
arunbhalerao67@gmail.com

४ टिप्पण्या:

  1. बर्‍याच दिवसांनी जोरदार पुनरागमन केल्याबद्दल स्वागत. नेहमीप्रमाणेच सडेतोड!!!

    उत्तर द्याहटवा
  2. नेमाडे महाशयांच्या कादम्बरीवर
    खूपच छान शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अभिनंदन.

    उत्तर द्याहटवा
  3. नेमाडे यांची हिंदूधर्माविषयीची कल्पना काय आहे हे एवढ्या मोठ्या ग्रंथात कोठेही स्पष्ट झालेले नाही वा ते करण्याची तसदी घेतलेली नाही.

    उत्तर द्याहटवा
  4. मला आपला ब्लॉग फोल्लो करायचा आहे कृपया त्याची माहिती कलेल का? फोल्लो कसा करता येइल?

    उत्तर द्याहटवा