निर्भीड व्हा--१२
अमेरिकेची लोकशाहीची काळजी-२
लोकशाहीत वर्तमानपत्रांची फार मोठी जबाबदारी असते व परंपरेने त्यांनी जनहिताची चाड ठेवणे आवश्यक असते. पण मीडीयातही शेवटी माणसेच असतात व सत्तेपुढे माणसे नमतातच. अशी फार थोडी माणसे असतात की जी एखाद्या चुकीच्या जनहित विरोधी निर्णया विरुद्ध स्वत: खंबीरपणे उभी राहतात व इतरांनाही धीर देतात.
अमेरिकेने इराक विरुद्ध लढाईचा निर्णय घेतला व चढाई केली ह्या घटनेविरुद्ध कोणी पत्रकाराने पवित्रा घेणे अमेरिकेच्या दृष्टीने राष्ट्रदोह करण्यासारखेच होते. अशा परिस्थितीत "न्यू यॉर्क टाइम्स" ने बुश यांना पाठिंबा देत सरकारी धोरणाची भलामण केली तर ते समजण्यासारखे आहे. पण देशात जर चर्चा करण्याची, खरे खोटे करण्याची परंपरा असेल तर चुकीची कबूली देऊन आपले धोरण सुधारण्याचे धारिष्टय फारच कमी वेळा पहायला मिळते. ज्युडिथ मिलर ह्या बाईची वात्रापत्रे सरकार जसे सांगे त्याचीच री ओढणारी असायची. सद्दाम हुसेन कडे अण्वस्त्रांचा साठा आहे असे सरकारच म्हणत असताना ही बाई त्याचे खरे खोटे करू शकणे हा अवघडच प्रकार होता. त्यामुळे तिचे लेख न्यू यॉर्क टाइम्स धडधडीत छापत राहिला.
कालांतराने विरोध जसजसा जाहीर होऊ लागला तसे टाइम्स ला आपली चूक लक्षात आली. मे,२००४ मध्ये त्यांनी एका तिर्हाईत संपादकाकडून शहानिशा करून ह्या बाईला संपादक पदावरून काढून टाकले, वाचकांची क्षमा मागितली व परत असे होऊ नये म्हणून ऑडिट करणारा एक खास संपादक नेमला.
ह्या प्रकरणाची माहीती "इराक पेपर्स" ह्या वरील पुस्तकातून मिळते व अमेरिकेची लोकशाहीची काळजी कशी मोलाची आहे हे ध्यानात येते.
अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com
या वरून आणीबाणी ची आठवण होणे साहजिकच आहे. त्या वेळेस आपल्या पत्रकारांनी सेन्सोर केलेल्या बातम्या व अग्रलेख जसेच्या तसे छापले आणि आपला "निर्भीड" पणा व लोकशाहीची काळजी दाखवून दिली पण हल्ली असे क़्वचितच घडते. आता तर बातम्या बनवल्या जातात म्हणे. असो.
उत्तर द्याहटवा