marathi blog vishva

रविवार, २५ जुलै, २०१०

निर्भीड व्हा--१३
अमेरिकेची लोकशाहीची काळजी--३
देशाच्या घटनेने लोकशाही विरोधात सामान्य जनतेला काही अधिकार दिलेले असतात. आपल्याकडेही हे अधिकार असणार. पण अमेरिकेत सरकार विरोधात लोकशाहीसाठी लढण्याची परंपराच असावी. कारण सरकारने जरी ११ सप्टेंबरच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवरच्या हल्ल्यानंतर पॅट्रियट अ‍ॅक्ट लागू करत विशेष अधिकार घेतलेले असले तरी जे नागरिकाचे लोकशाहीतले मूलभूत अधिकार असतात त्यानुसार लढण्याची अमेरिकेतली प्रथाच दिसते. कारण ही लढाई अन्याय्य आहे ही जाणीव व विरोध अमेरिकेत सर्वात प्रथम अगदी साधारण नागरिकांनीच करून दिली, असे "इराक पेपर्स" हे पुस्तक दाखवून देते.
अमेरिकेत "व्हिसल ब्लोअर अ‍ॅक्ट" अन्वये जर एखाद्या नागरिकाने सरकार विरुद्ध कारवाई केली तर कायद्याने त्याला त्याचा निकाल लागेपर्यंत संरक्षण मिळते. ह्यालाच इथे "विवेकी विरोधक" ( कॉन्शन्शियस ऑब्जेक्टर ) असे म्हणतात. इराक लढाई विरुद्ध पहिले पाऊल घेणारी एक महिला होती. कॅथरीन जॅशिन्सकी ही त्यांच्या सैन्यातली महिला शिपाई होती. तिने इराक युद्धात भाग न घेण्याचे ठरवले व २००४ साली तशी कारवाई केली. अशाच दुसर्‍या एका मरीन कोअर शिपायाला ( स्टीफन फंक) अशाच कारणास्तव २००४ साली अटक झाली. नॉन-कमिशन्ड ऑफिसर, कॅमिलो मेजिया ह्यालाही मग २००७ मध्ये अटक झाली. होता होता अजून आठ-दहा अधिकार्‍यांनाही तुरुंगवास पत्करावा लागला. ज्या ग्वांटानामो बे वर लढाईतले कैदी ठेवले होते त्यांना जिनेव्हा कन्व्हेंशन प्रमाणे वागणूक मिळत नाहीय असेही मग काही सैन्याच्या वकीलांनी दाखवून दिले. मग निवृत्त सेना-अधिकार्‍यांनी त्यांच्या सरकारवर खटलेच भरले.
त्यानंतरचा इतिहास आपल्याला माहीतच आहे. बुश सरकार जाऊन ओबामा यांचे सरकार आले व लढाई विरुद्ध जनमत चांगलेच तापले. तर लोकशाही साठी असा सामान्यांनीच पुढाकार घेतला तर त्याचीच एक छान लोकशाही परंपरा तयार होत असावी अमेरिकेत !

अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

३ टिप्पण्या:

  1. तू जरी आम्हाला अमेरिकेतील लोकशाही बद्दल "इराक पेपर्स" हे पुस्तक वाचल्या वर तिथल्या जागृत किंवा लोकशाहीची काळजी करणाऱ्या लोकां बद्दल किंवा प्रसंगा बद्दल सांगत असला तरी या सगळ्यांची तुलना भारतीय लोकशाहीशी केल्याशिवाय राहवत नाही. भारतात आजकाल जन आंदोलनाची वानवाच आहे आणि जी काही आंदोलने होत असतात ती राजकीय असतात. हि गोष्ट खरी आहे कि सामान्यांनीच पुढाकार घेतला तर त्याचीच एक छान लोकशाही परंपरा तयार होते आणि राज्यकर्त्यांना या जन आंदोलनांचा धाक वाटतो. असो.
    अगदी रस्त्या वरचा पोलीस पासून ते थेट युनियन कार्बाईडच्या ऍंडरसनना अटकेतून जामीनावर सोडणारे राज्यकर्ते इतपर्यंत अनेक घटना बघितल्या वर अमेरिकेची लोकशाहीची काळजी तुला प्रकर्षाने प्रभावित करत असेल.

    उत्तर द्याहटवा
  2. We would like to read more about Irque Papers,can you contribute a seperate,detailed article.- Vijay Lele,Editor Kistreem

    उत्तर द्याहटवा
  3. लोकमत अमेरिकेच्या धोरणात जोवर बदल घडवून आणू शकत नाही तोवर या लोकशाहीचा विचार न करणे योग्य.

    उत्तर द्याहटवा