marathi blog vishva

बुधवार, ३१ मार्च, २०१०

दुतोंड़ी चिदंबरम

निर्भीड : २
दुतोंड़ी चिदंबरम

चिदंबरम ह्यानी ग्रह खाते घेतले तेंव्हा त्यांचा भर होता पारदर्शकते कड़े । मध्यंतरी त्यानी मुंबई दहशत विरोधी पोलीस दलाला काही माहीती दिली व त्या बरहुकूम के पी रघुवंशी ह्यानी कारवाई केली । इतके करूनही रघुवंशी ह्यांची उचल बांगडी झाली । कारण काय तर त्यानी प्रामाणिक पणे जी माहीती मिळाली होती ती मिडीयाला दिली । झाले साहेबांचे पित्त खवलले। स्वतःची छबी प्रामाणिक पणाची, पण इतरानी तसे न करता माझ्या सांगण्या बाहेर जायचे नाही । लोकशाही प्रणालीत वरिष्ठानी तत्वे घालून द्यायची असतात व मग ती खाल्च्यानी पालाय्ची असतात। पण लोकशाही हवीय कोणाला ?

अरुण भालेराव
९३२४६८२७९२

सोमवार, २९ मार्च, २०१०

अमिताभ आणि सोनिया

निर्भीड
अमिताभ आणि गांधी
अमिताभ कोणाला आवडत नसावा ? सोनियाजींना का राहूलला का प्रियांकाला ? एकेकाळी राजीव गांधींशी इतके मेतकूट की मुलांना घेऊन स्वित्ज़र्लंड मध्ये अमिताभ आणि त्याच्या मोठया भावाने बिर्‍हाड बसवले होते. म्हणजे आत्ताचा खुन्नस सोनियाजींचाच असणार.
का बरे असावा हा राग ? राजकारणात खरे कारण नेहमी पैसाच असते. कारण आजकाल सर्व जण राजकारण पैसे मिळविण्यासाठीच करतात ना ! आणि म्हणूनच राजकारणात नेहमी वारस म्हणून घरचाच माणूस असावा लागतो. अमिताभ सारखी गत पूर्वी कोणाची झालीय ते आठवून पहा. नटवर सिंह हे इंदिरांजींपासून खास मर्जीतले. पैशाचे सर्व व्यवहार सांभाळणारे. आणि इराक मध्ये त्यांनी परस्पर डल्ला मारला, पैसे पोचते केले नाही म्हणून त्यांचे मंत्रीपद तर गेलेच नि आता नसत्या केसेस मागे लागल्या आहेत.
तर पैसा कोणी सोडत नाही. आता सोनियाजींकडे थोडे का पैसे असतील ? पण पैशाबाबत नियम असा की जितके ज्याच्याकडे पैसे ज्यास्त तितका तो पैशाबाबत कडक. कारण पैशाची खरी किंमत गडगंज पैसेवाल्यालाच. निष्कांचनाला पैशाचे काय होय ?
तर ह्या हिशोबाने अमिताभचा राग करण्यामागे खरे कारण असणार पैसा ! बोफोर्सचा आणि इतर ठेवायला दिलेला. तो ह्याने एकतर परत केला नसणार किंवा हिशोबात गफलत असणार. बरे आता अमिताभने देतो म्हटले तरी घेण्याची जोखीम राहतेच. म्हणून परत राग ! समाजवादी पक्षाला जवळ केले, अमरसिंहांना मित्र केले, मोदींशी संबंध ठेवले वगैरे सर्व कारणे वरवरची. खरे कारण असणार बक्कळ पैसा ! आणि तोच जर भरवशाच्या माणसाने दिला नाही तर तोफेच्या तोंडीच द्यावे लागणार त्याला . हाच न्याय, हेच खरे सत्य !