marathi blog vishva

सोमवार, १० ऑक्टोबर, २०१६

स्वेच्छा व कार्यकारण

स्वेच्छा व कार्यकारण

---------------------------

ही हैदराबादची तेरा वर्षाची मुलगी ६८ दिवस उपास करूनही तगली असती तर किती बरे झाले असते. पण तिचा उपास तपस्या ही खरेच स्वेच्छेने केलेली होती ? काय असते स्वेच्छा ?

जगातले जे पदार्थ आहेत त्यांना शास्त्राचे नियम लागू होतात व त्यांना निश्चित असे कार्य कारण असते. म्हणजे असे केले तर असे होईल. पण माणसाचे मन हे काही भौतिक पदार्थ नाही, मग त्याला असते का स्वेच्छा ?

आपण कपडे घालतो, चालीरीती आचरतो ते सगळे आपण न ठरवता दुसरेच ठरवतात. आणि त्यांचा इतका प्रचंड पगडा असतो की साधे अनवाणी कुठे जायचे तर ते आपल्याच्याने होत नाही, कपडे ( निदान बापूंसारखा सदरा न घालता ) न घालता तर दूरच.

पण आजकाल क्वांटम शास्त्रात हेही चूक ठरवतात. अणूच्यातल्या एका कणाची गती मोजायला गेले तर म्हणतात की त्या कणाचे निश्चित स्थान ठरवता येत नाही. जिथे शास्त्रातच अशी अनिश्चितता आहे तिथे माणसाच्या मनाचे कसे काय ठरवावे ? ६८ दिवसाचे उपासाचे तप करणे ही निश्चितच १३ वर्षाच्या कोण्या मुलीची स्वेच्छा प्रवृत्ती होऊ शकत नाही. हे निश्चितच त्या समाजाचे दडपण असावे.

आंता कोणाला हे दडपण स्वेच्छेने घ्यायचे असेल तर तसे कोणाला घेऊ द्यावे काय ? लहान मुलांना ह्यापासून नक्कीच आवरायला हवे. त्यांना असे करू देऊ नये.

नक्की ? बघा बुवा !

-------------------------

शनिवार, २४ सप्टेंबर, २०१६

जीडीपी

-------------------------------------------------------------
जीडीपीचा टक्का--अनमान धपका ?
----------------------------------------
सगळी सरकारे आपली प्रगती मोजण्यासाठी जीडीपीचा आकडा वापरतात. काय असतो हा आकडा ?
तर, हा असतो त्या काळात ( वर्षात/तिमाहीत) उत्पादित वस्तू आणि सर्व्हिसेसची एकूण किंमत. हे आकडे सेंट्रल स्टॅटिस्टिक्स ऑरगनायझेशन नावाचे सरकारी खाते पंतप्रधानांच्या ऑफिसातून जाहीर करते. ह्यांच्याकडे डायरेक्टर, डेप्युटी डायरेक्टर, वगैरे असे १५० सरकारी अधिकारी असतात. त्यातले औद्योगिक उत्पादन मोजणारे एक ऑफीस कलकत्त्याला आहे. सगळ्या देशाचे उत्पादन व त्याची किंमत हे एवढेच लोक मोजत असतात.
गंमत म्हणजे सरकार व राजकारणी हे मुळातला आकडा कधीच वापरत नाहीत. मागच्या वर्षीपेक्षा यंदा ह्या आकड्यात किती वाढ झाली त्यावरून हे आपापली पाठ थोपटतात किंवा इतरांना नाके मुरडतात. सगळ्या जगात जो श्रीमंत देश आहे, अमेरिका, त्यांची जीडीपी वाढ फक्त २ ते ३ टक्क्यानेच होते व आपली वाढ सध्या ५/६ टक्के आहे असे सरकार सांगत राहते.
ह्या वर्षीचा पहिल्या तिमाहीचा जीडीपीचा आपला आकडा आहे : १३,७१,०००,००,००,००० रुपये. ( तेरा लाख एकाहत्तर हजार कोटी रुपये ). हा मोजतांना त्यांनी कोणकोणत्या क्षेत्रातले उत्पादन मोजले आहे ? तर, शेती, मत्स्यव्यवसाय, व जंगले ( एक लाख ८१ हजार कोटी रुपये ); खाणी ( २५,५६८ कोटी रुपये ) ; उद्योगांचे उत्पादन ( १,९८,८२७ कोटी रुपये ) ; वीज, गॅस, पाणी ( २६,९७८ कोटी रुपये ) ; बांधकाम व्यवसाय ( १,०८,२६६ कोटी रुपये ) ; व्यापार, हॉटेल्स, दळणवळण, कम्युनिकेशन ( ३,८४,५६७ कोटी रुपये ) ; वित्तीय संस्था, बॅंका, इन्शुरन्स, रियल-इस्टेट, व्यापारी सर्व्हिसेस ( २,७३,३८८ कोटी रुपये ) ; कम्युनिटी, सोशल & पर्सनल सर्व्हिसेस ( १,७२,१४९ कोटी रुपये ).
हे आकडे देताना अशी काही जोखीम नसते की ते आकडे चुकीचे निघाले तर कोणाला काही त्याप्रमाणे पैसे द्यावे लागतील. हे मुळात "अंदाज" ( एस्टिमेटस्‌ ) ह्या स्वरूपातच दिलेले असतात. आपले अमर्त्य सेन ह्यांना फ्रान्स सरकारने बोलावून त्यांच्याकडे जीडीपी ची आकडेमोड रद्दबातल करून ह्यूमन इंडेक्स ची पद्धती सुरू केलेली आहे हे अमर्त्य सेन भारतात सांगत नाहीत. आर्थिक विवेचनात कोणीही जीडीपी च्या आकड्यांना काडीचीही किंमत देत नाहीत. कारण त्याने देशातल्या जीवनमानाची वा आर्थिक नियोजनाची काहीच परिमाणे हाती लागत नाहीत.
आता वरील आकड्यातील मोठे मोठे आकडे घेतले तर ते किती मोघम असण्याची शक्यता आहे ते पडताळून पहा : उदाहरणार्थ व्यापार, हॉटेल्स, ट्रक वाले व टेलिफोन वाले ह्यांचे व्यवसायच असे आहेत की जिथे उजळ माथ्याचे कमी व हातचे ठेवलेले जास्त असते. अशा ठिकाणी मोजणार्‍यांना आकडे वाढविण्याचा किती वाव असतो हे कोणाच्याही ध्यानात येईल. तसेच बांधकाम व्यवसायाचे आहे. विजेचा तुडवडा सगळीकडे दिसतो खरा पण जीडीपीत मात्र ग्रोथ ! मत्स्य व्यवसायात किती मासे गळाला लागले हे जिथे कोळ्यालाच माहीत नसते तिथे सरकारला त्याचे मोजमाप कसे जमावे ? किंमती वाढल्या की जीडीपी वाढतो हे कोणालाही समजावे. शिवाय जीडीपीत ग्रोथच मोजायची असते, निखळ आकडे कोण पाहतो ? आधीच सरकारी आकडे हे किती सोवळेपणाचे असतात हे आपण प्रत्यही पाहतोच. तशात मोजायला अवघड असे हे सगळे आकडे मोजणे म्हणजे बिरबलाने जसे कावळे मोजले होते ( जेव्हा अकबराने किती कावळे असतील असे विचारल्यावर ) त्याच धर्तीचे आहे. पण हे आपल्या लक्षात येत नाही व आपण राजकारणी लोकांच्या आकड्यांना व त्यांच्या समर्थनाला बळी पडतो. बरे कोणी अर्थशास्त्रीही हे सांगत नाहीत. कारण सर्वांचेच हितसंबंध त्यात गुंतलेले असतात.
---------------------------------------------

शनिवार, १६ फेब्रुवारी, २०१३

एक अप्रतीम चाल !

निर्भीड व्हा---३८
-------------------
सोनिया राहूल ह्यांची अप्रतीम खेळी !
-----------------------------------
     आधी "हिंदू-आतंकवाद" कसा आहे, त्यात सात-आठ माणसे कसे आरएसएसचे आहेत असे सुशिल शिंदे ह्यांनी म्हणायचे, आणि जे गेल्या चार वर्षांपासून पकडलेले आहेत त्यांच्यावर कोर्टात कुठलीही कारवाई करायची नाही. साध्वी प्रज्ञासिंग हिच्या प्रकृतीची तर इतकी सरकारी हेळसांड केलेली आहे की बिचारीला आता कॅसरच झाला आहे. एका कॅंसरवाल्या बाईला परदेशी जाऊन उपचार घेता येतात तर दुसरी ही बाई उपचार घ्यायलाही सोडली जात नाही. शिवाय आतंकवादाचा इतका गंभीर गुन्हा आहे तर मग इतकी वर्षे झाली अजून मुकदमा लादणे नाही, कोर्टातर्फे काहीही कारवाई नाही. कारण हे उघड उघड राजकारणाचे प्रकरण आहे व ते राजकारणासाठीच वापरायचे आहे. आता निवडणुका आल्यात तेव्हा भाजपची बोलती बंद करायला हे हिंदू-आतंकवादाचे प्रकरण छानच आहे.
    अफजल-गुरू ला फाशी द्यायचे आधी १२ वर्षे टाळायचे आणि आता निवडणुकांच्या तोंडाशी पटकन्‌ फाशी देऊनही मोकळे व्हायचे ह्यात फार अप्रतीम राजकीय खेळी आहे. खुद्द भाजप सुद्धा ह्या कारवाईची तारीफच करते आहे. त्यामुळे हिंदूंची मते जी दूर जात होती ती आता वळती करणे सुकर होईल ना !
    आणि आता सर्वात वरचढ ठरणारी चाल ! भ्रष्टाचार विरोधाची ! त्याची मुहूर्तमेढ एक वर्षांपासून चाललेली होती व आता चांगला मुहूर्त सापडलाय, निवडणुकांचा. सगळे राजकीय पंडित जाणतात की कॉंग्रेसच्या विरुद्ध जे मत आहे ते भ्रष्टाचारांच्या घोटाळ्यांमुळे ! आता कितीही पुरावे दिले वगैरे तरी भ्रष्टाचार नाहीय असे कसे सिद्ध करायचे ? जे घोटाळे झालेत ते चौकशीच्या शुक्लकाष्ठाने लांबणीवर तर टाकलेच आहेत. पण त्याने भ्रष्टाचार झालाच नाही किंवा तो नव्हताच असे कसे सिद्ध करायचे ? तर आता हा मास्टर-स्ट्रोक पहा. अमेरिकेत, पाकिस्तानात, बांगला देशात, अफगाणिस्तानात, सोनियांच्या बोलाला काही मोल मिळेल असे काही आजचे राजकारण नाही. सगळ्या जगात असा एकच त्यांचा देश आहे, इटली, जिथे त्या आपल्या शब्दात काही सांगू शकतात. त्यांना मग तिथे काय अवघड आहे. बरे त्या काही अवैध करायला सांगत नाहीत. त्या म्हणताहेत की एका माणसाला अटक करा आम्ही सांगतो त्या माणसांची नावे घ्या व आमच्या सरकारला काही कागदपत्रेही देऊ नका. ज्यांनी काही केलेच नाही ते तर नंतर सुटणारच आहेत.
    तर ही खेळी मास्टर-स्ट्रोक कशी ? तर काय होईल की आपण कारवाई केलीय हे ठळकपणे दाखवता येईल. संशयाची सुई पाहिजे त्यांच्याकडे दरम्यान वळवता येईल. आणि हे प्रकरण मिटवताना मुळात काही भ्रष्टाचार नव्हताच असे दाखविले की मग बोफोर्स, टू-जी, थ्री-जी, कॉमनवेल्थ असे अनेक घोटाळ्यांना ह्याचा फायदा मिळेल. निवडणुकीपूर्वी सगळे डाग फिके पडतील. आणि कॉंग्रेस नक्कीच निवडून येईल. चेक ऍंड मेट !
-----------------------------------------

सोमवार, २३ एप्रिल, २०१२


"इम्मॉरलस्‌ ऍनोनिमस"
    ज्यांना दारूचे व्यसन आहे व ते सोडायचे आहे त्यांच्यासाठी सगळ्या जगात एक संस्था आहे "अल्कोहोलिक्स ऍनॉनिमस" , म्हणजे "निनावी बेवडे". आठवड्यातून दोन वेळा ह्या संस्थेचे वर्ग होतात. त्यात पहिली अट अशी असते की नवीन येणार्‍या सभासदाने प्रथम कबूल करायचे की तो अल्कोहोलिक म्हणजे दारूचा व्यसनी आहे. त्यानंतर सगळे सुधारण्याचे वर्ग वगैरे.
    हे आठवण्याचे कारण की आजकाल कोणावरही काही लाचलुचपतीचे किंवा वाईट वर्तणुकीचे आरोप झाले की तो हमखास म्हणतो की हे आरोप करायचा तुम्हाला अधिकार नाही कारण तुम्ही कोणते साफ-सुथरे लागून गेलात. जसे: नुकतेच कॉंग्रेसचे अभिषेक मनु सिंघवी ह्यांना राजीनामा द्यावा लागला, तो आरोप. त्यांच्या एका जुन्या ड्रायव्हरने काही रागाने त्यांच्या लैंगिक गैरवर्तुणीकीची एक सीडी प्रसिद्ध केली. यू-ट्यूब वर. आणि ती इतर ५० हजार लोकांसोबत मी ही पाहिली. त्यात बहुतेक वेळा मनु सिंघवी ह्यांचे टक्कलच दिसते, पण काही ठिकाणी एक बाई त्यांच्याशी रतिक्रीडा करते आहे हेही दिसते. आता ही अगदी खाजगी बाब आहे हे खरे, पण लगेच कॉंग्रेसच्या प्रवक्त्याने म्हणावे की भाजप ला तर असे आरोप करण्याचा काहीच अधिकार नाही कारण कर्नाटक व गुजरातेत त्यांचे खासदार असेच करतात. आता हे अजब नीती-शास्त्र आहे. फक्त चांगल्या लोकांनीच वाईटांना वाईट म्हणावे असा काही नियम नाही. किंवा चोराच्या घरी चोरी केली तर ती क्षम्य असते असेही नाही. वाईट ते वाईटच.
    सीतेवर संशय घेणारा य:कच्छित धोबी होता. त्याचे चारित्र्य फार धुतल्या तांदळासारखे होते अशातला भाग नाही. पण प्रभु रामचंद्रांना त्याच्या आरोपावर कारवाई करावीच लागली. वर सांगितलेल्या "निनावी बेवड्यांच्या" सभेत कोणी असे नाही म्हणत की मला दारू पिऊ नकोस असे म्हणणारा तू तर स्वत:च दारुडा आहेस. जे अनीतीच्या मार्गाने जातात त्यांना नीतीचा मार्ग कोणता हे दाखवण्याचा पूर्ण अधिकार आहेच. ख्रिश्चन धर्मात तर मी पापी आहे असे आधीच कबूल करावे लागते व मगच क्षमा याचना !
    त्यामुळे कॉंग्रेस व इतर पक्षाच्या प्रवक्त्यांनी हे न पटणारे नीती शास्त्र आता सोडून द्यावे व "निनावी बेवड्यांच्या" धर्तीवर "निनावी वाममार्गी" अशी संस्था काढून प्रत्येकाकडून आधीच कबूल करून घ्यावे की मी वाममार्गी आहे. हे ते राजकारणी जितक्या लवकर करतील तितका त्यांना सुधरण्याचा मार्ग लवकर सापडेल. ते कबूल करोत वा न करोत, जनता जाणतेच की सगळेच वाममार्गी आहेत. अण्णा हजारे जेव्हा म्हणाले की सगळे सांसद लुच्चे लफंगे आहेत तेव्हा सगळ्या खासदारांना काय राग आला होता. मनु सिंघवीही म्हणाले होते, हे बरे नाही. पानसिंग तोमार सिनेमात जेव्हा त्याला विचारतात की चंबळला राह्तोस तर मग तुझ्या कुटुंबात कोणी दरोडेखोर आहेत का ? तेव्हा तो उत्तर देतो की दरोडेखोर तर संसदेत असतात ना ?
    तर राजकारण्यांनो जितक्या लवकर कबूल कराल की तुम्ही सगळे चोर आहात तितक्या लवकर तुमचाच उद्धार होईल. "निनावी वाममार्गी" संस्था तुमची वाट पाहते आहे !
---------------------------------------------
अरुण अनंत भालेराव
------------------------------------

मंगळवार, २० मार्च, २०१२



निर्भीड व्हा--३७
१७ खून माफ !
    "टाइम" मॅगझीनच्या कव्हरवर फोटो येणे हे फार थोर्थोरपणाचे नक्कीच आहे. तसे आजकाल कित्येकांना आपला फोटो कुठे येऊ नये असे वाटत असते ( जसे सोनिया गांधी कोणत्या उपचारांसाठी कोणत्या अमेरिकन इस्पितळात गेल्या त्याचा फोटो, किंवा राहूल गांधी सध्या कुठल्या वधु-संशोधनाला कोणत्या देशात गेले आहेत त्याचा फोटो...). अशात नरेंद्र मोदींचा फोटो "टाइम" मासिकावर यावा हे मोठे कौतुकाचे आहे.
    आपल्याकडे जी भावना सामान्यात असते की एक जरी चांगले काम कोणाकडून घडले असेल तर त्याच्या १७ खुनांना माफी मिळू शकते, त्याच गोशवार्‍याचा मजकूर वरील "टाइम"च्या अंकात वाचायला मिळतो. त्यात एका नवीन प्रकरणाबद्दल वाचायला मिळते. ते असे: एक ४२ मिलियन डॉलरचे रस्ता-बांधणीचे टेंडर असते. त्यात आय-आर-बी नावाची कंपनी भाग घेते. त्यांचा चीफ कोणी विरेंद्र म्हैसकर म्हणून आहे तो म्हणतो, सबंध टेंडर प्रक्रिया व कंत्राट देणे हा सगळा कारभार ऑनलाईन झाला व तो सर्वांना उपलब्ध होता. एवढे मोठे कंत्राट मिळाले, पण ना कोणाला चहापाणी, एवढेच काय कोण मेयर होता तेही आम्हाला माहीत झाले नाही. पारदर्शकपणे सरकारी कामे कशी व्हावीत ह्याचा हा आदर्श नमूना म्हणायला हवा.
    नरेंद्र मोदी हे शिक्षणाने अगदी सामान्य शिक्षण घेतलेले गृहस्थ आहेत. ते कुठल्याही कॉलेजात गेलेले नाहीत. ह्या उलट सोनिया गांधी व राहूल गांधी हे केव्हा हार्वर्ड विद्यापीठात जाऊन उच्च शिक्षण घेऊन आले ते संशोधन करण्याचाच विषय होईल. इतके असूनही शिक्षणाचा मरातब नरेंद्र मोदींनी इतका राखलाय की त्यांनी सगळ्या सरकारी अधिकार्‍यांना आठवड्यातून एक दिवस आणि तेही फक्त एक तास, वाचनासाठी ठेवला आहे. त्यांनी त्या दिवशी कुठल्याही जवळच्या ग्रंथालयात जाऊन एक तास वाचावे, असा नियम केलेला आहे. आणि ह्या नियमाचे काटेकोर पालनही होते. अधिकार्‍याला आपण कुठे जाऊन वाचणार आहोत व काय वाचले त्याचा तपशीलवार अहवाल द्यावा लागतो. वाचनाचा इतका मरातब कोणत्याही सत्पुरुषाने असा कधी केला नसेल.
    आज भारतीय संस्कृतीची प्रत्यही इतकी पडझड होत असताना, एक राजकीय व्यक्ती, जी कोणत्याही हार्वर्डची पदवी नसलेली आहे, तिने वाचन-संस्कृतीच्या उद्धारासाठी इतका आटोकाट प्रयत्न करावा हे अपार कौतुकाचे आहे. आणि ह्या एकाच सत्कर्मासाठी आपण ह्या नरेंद्र मोदींना १७ खून माफ करायला हवेत !

--------------------------------------------------------
Nirbheed ---37
17 Murders Condoned !
    Now a days our politicians fear of their photo appearing in any media. That explains why no body could publish the photo of Sonia Gandhi taking treatment in some American Hospital. So also we do not have photo of Rahul Gandhi, who presently may have gone abroad, bride-hunting ! On such a background if Narendra Modi's photo appears on TIME magazine, one has to give him all the kudos !
    We have a popular feeling residing in the minds of common people that if our leaders do one good act, we can condone their 17 murders. So rare is the good work to see these days. One is fully aware of various development stories that Narendra Mody has implimented in Gujarat. One gets to read, one more, in this TIME issue. One CEO of an Infrastructure company by name IRB tells us how they participated in a tender for some road-work worth 42 million $ and how the whole process was available to all, online. They did not have to give even tea & snacks to anybody. In fact this CEO, ( Mr. Virender Mhaiskar ) tells how he even did not know the name of the mayor concerned. This should serve as a model lesson to all beurocrats on transparent working in the Government.
    Narendra Modi had a very ordinary education, the interview tells us. This is unlike the great pains Sonia Gandhi or Rahul Gandhi take in convincing us that they are Harward educated. This should be a subject for research for many as to when these Gandhis had done this learning at Harward. Based on this insistance of Grandly educated, Narendra Modi openly confesses that he did not go to any college. But inspite of not gettting any prestigious education, it seems he is striving for maintaining the prestige of education in his State. He has made a rule for his officers that they must spend at least one hour every week, in reading. They have to declare in advance which nearest Library they will go to and read and later have to report on what they read in that one hour. No person in Indian Polity has given so much importance to reading !
    In today's times when we daily see the signs of collapse of our culture all around us, it is so heartening that someone is caring to develop the reading culture. And for this one good deed alone, we may condone Mr.Modi for 17 murders that he may or may not have committed in the past !

--------------------------------------------------------------------------------------

शुक्रवार, १० फेब्रुवारी, २०१२




निर्भीड व्हा---३६
बाल कामगार--रैहान आणि मिराया वद्रा
    वरच्या फोटोत दिसताहेत ते आहेत १२ वर्षांचा रैहान वद्रा व १० वर्षाची मिराया वद्रा. ही आहेत प्रियांका गांधीं-वद्राची मुले. प्रियांका गांधी-वद्रा ह्या आहेत सोनिया गांधींची मुलगी आणि सोनिया गांधी होत्या राजीव गांधी ह्यांच्या पत्नी. आता राजीव गांधी हे इंदिरा गांधींचे पुत्र होते व इंदिरा गांधी ह्या जवाहरला नेहरू ह्यांची मुलगी होती हे तर लोकांना माहीतच असते.
    आजकाल निवडणुकीच्या सभांना प्रियांका वद्रा ह्या आपल्या दोन्ही मुलांना स्टेजवरही घेऊन जातात. अर्थात हेलिकॉप्टरने नेत असतात हे तर साहजिकच आहे. कोणाला वाटेल हे किती साहजिक व स्वाभाविक असे आहे. प्रियांका ही एक साधी गृहिणी आहे. बिचारी आपले घर व संसार सांभाळत असते. त्यात निवडणुकीच्या वेळेस भाऊ राहूल गांधी व आई सोनिया गांधी ह्यांना रायबरेली व अमेठी ह्या मतदारसंघात निवडणुकीच्या सभा घेत मदत करते. आता घर सांभाळता सांभाळता मुलांना कुठे ठेवील ? तर म्हणून त्यांनाही बरोबर घेऊन जाते. ह्यात तुम्हाला खास असे काय दिसते ?
    पहिल्यांदा डोळ्यात भरते ते प्रियांकाचे अगदी इंदिरा गांधीसारखे दिसणे व त्यासाठी केलेली खास केशरचना. आता हे काही केवळ एका नातीने आजीसारखे दिसावे ह्या साध्या उद्देशाने खासच नाहीय. मायावतीचे हत्तीचे पुतळे हे निवडणूक चिन्हासारखे दिसतात म्हणून निवडणूक आयोगाने ते झाकायला लावले ते कशामुळे ? तर दिसण्याचा मरातब व पगडा मतदारांवर पडून एखाद्यालाच त्याचा लाभ मिळू नये म्हणून. तर आता प्रियांकाने अगदी हुबेहुब इंदिरा गांधींसारखी केशरचना करून मतदारांवर इंप्रेशन पाडले की बघा मी त्यांचीच नात आहे असे दाखवत तर ते एकाच्याच सोयीचे होत नाही ?
    झाशीची राणी लक्षुमबाईचा अश्वारूढ पुतळा आठवा. उगारलेल्या तलवारीने तिचे जेव्हढे शौर्य दिसते, त्यापेक्षा ज्यास्त परिणामकारक आहे तिचे पाठीशी गुंडाळलेले तान्हे मूल. त्यामुळे ती कशी ज्यास्तच उठावदार होते. अगदी ह्याच कारणामुळे जर्मनीत असा एक कायदा आहे की तान्ह्या मुलांचे फोटो जाहीरातीसाठी वापरणे बेकादेशीर आहे. कारण काय तर पाहणार्‍यांच्या भावनांशी तुम्ही खेळता व आपला धंदा करून घेता, हे काही चांगले नाही. तुम्हाला जाहीरातच करायचीय तर मोठे ( वयाने ) कलाकार घ्या. त्यांच्या मार्फत तुमच्या उत्पादनाची जाहीरात करा. शिवाय मुलांना जाहिरातीत वा सिनेमात कामे करायला लावून त्यांचे बालपण हिरावून घेणारे आईबाप आपण पाहिलेलेच आहेत. ते तर वेठबिगार बाल-कामगारच होतात. ह्यामुळेच तर आजकाल बर्‍याच हॉटेलातून तुम्ही पाहिले असेल की बोर्ड लावलेले असतात की आम्ही बालमजदूर ठेवीत नाहीत. आता ह्या पार्श्वभूमीवर पहा, आपण वर्तमानपत्रात आलेला फोटो किती काळजीने पाहतो. बघू बघू कशी आहेत तिची मुले ? हा त्यांच्या बालपणाचा गैरवापरच आहे. कोणी तरी ह्याविरुद्ध निवडणूक आयोगाकडे तक्रारच करायला पाहिजे.
    साधी गोष्ट पहा . पाहणार्‍यांचे कुतुहूल कसे चाळवले जाते ते. ह्या पोरांची नावे आहेत: रैहान ( १२, मुलगा ) व मिराया ( १०, मुलगी ). आपल्याला नावांचेही कुतुहूलच वाटते. मग कोणी तरी माहीती काढते की रैहान हे अरेबियन नाव असून त्याचा अर्थ होतो, स्वर्गाचा सुवास. आणि मिराया हे हिंदू नाव असून कृष्णाची लाडकी मीरा हिचेच हे नाव आहे. आता हे एक प्रकारे लोकांना सांगणेच झाले की पहा आमच्या एका नातवाचे नाव मुस्लिम धाटणीचे आहे तर नातीचे नाव हिंदू वळणाचे आहे. निधर्मीपणा साक्षात दाखवण्याचा किती प्रभावी मार्ग आहे हा ! शिवाय प्रियांका हे हिंदू नाव, तिचे पती रॉबर्ट वद्रा हे ख्रिश्चन, तिचे सासरे हिंदू तर सासू ख्रिश्चन. ह्यात सोनिया ह्यांचा धर्म मिळवा म्हणजे धर्म-संकर काय असतो ते थेट कळेल. आम्ही मुसलमानांना ९ टक्के आरक्षण देऊ असे कायद्याने म्हणावे, पण बघा माझ्या नातवाचे नावही मी मुसलमानी वळणाचे ठेवले आहे ही अंतस्थ हेतूची तरकीब होते. आणि त्यात निष्पाप पोरांना नाहक वापरले जाते. म्हणूनच तर ते बाल-कामगार ठरतात. आणि त्यासाठी त्यांच्या आई-वडिलांना दोष द्यायला पाहिजे. अगदी निर्भीडपणे !
------------------------------------------------
अरूण अनंत भालेराव
-------------------------------------

Child-abuser Priyanka and Congress

-------------------------------------
    The children you see in the above photo are son and daughter of Priyanka-Gandhi-Vadra. You are aware that Priyanka is daughter of Soniya and Soniya is wife of Rajiv Gandhi, who was son of Indira Gandhi ,who was daughter of Jawaharlal Nehru, our first Prime Minister.
    Nowadays Priyanka Vadra takes alongwith her two children and puts them on the stage for the show. Raihan, 12, her son and Miraya who is 10 and is her daughter obviously get to ride in the helicopter and that must be their motivation to forgo school and studies and be present on the stage electioneering in Raybareily and Amethi. What about the motivation of Priyanka about carrying her children around. Don't get fooled by the show of a busy housewife scurrying her children with her, instead of keeping them with the baby-sitter or in a day-care. The obvious motivation is to play on the sentiments of the voters. That is why her studied hairstyle is so closely resembling Indira Gandhi. And this is no case of infatuation but a cunning master-stroke to garner the sympathies by playing the similarity of looks with Indira Gandhi. If Election Commissioner can ask Mayavati to wrap her elephants so that it provides equal level playing fields to all the candidates, then it is undue advantage to allow Priyanka to depict herself in the style of Indira Gandhi. Exactly for the same reason for which one cannot use govt. machinery so that voter should not get unduly impressed with the party-in-power , it is for the same reason we should prevent Priyanka from reminding voters that she is grand-daughter of Indira Gandhi by looking like her.
    If you ever look at the statue of Laxmibai, the queen of Jhansi, look more closely at the child she has wrapped on her back. The bravery that she demonstrates by her raised sword on the horseback gets amplified many times more by this wrapped child. Exactly for this reason, there is a law enacted in Germany that children are banned in the commercial advertisements. When we see children, we get easily carried away by their innocent faces. And this is an undue advantage for the few who are using children for selling their products. This is disallowed for the same reason for which children are debarred from working in factories and selling goods. If you have observed closely, nowadays most of the hotels are displaying billboards stating that they don't employ child labour. We know that many parents rob the children of their pleasant childhood when they work in advertisements and films or in any job. On this background Priyanka using her children to ask for votes is nothing short of child-abuse and it is worth complaing about the same with the Election Commissioner.
    Just see how the simple thing like names of these children is used to the advantage of Congress. The 12 yr old son is named Raihan, which is said to be an Arabian name, meaning "Sweet smell of Heaven" and the 10 yr old daughter is named Miraya which is a Hindu name of Meera the devotee of Lord Krishna. This is the most emphatic use of children's names to convince the voters that Congress is so secular that the grandson is named in Arabian tradition, appeasing the Muslim votes. And for Hindu voters there is always the grand-daughter Miraya. If you don't succeed in appeasing Muslims through the 9% reservation that Election Commission has turned down, you can always win by the sentimental way of putting Raihan on the stage and proclaim the same appeasement. This is nothing short of Child-abuse !

-----------------------------------------------------------------------------------------------------------------
Arun Anant Bhalerao
--------------------------------------------------------------------------------------------------

गुरुवार, २४ नोव्हेंबर, २०११

-------------------------------------------------------------------------------------------
निर्भीड व्हा----३५
थोबाडीत देणे
वयाच्या कोणत्या वर्षात "थोबाडीत देणे" सहन करावे लागते, त्याप्रमाणे त्याची दाहकता असते. शालेय शिक्षणात साधारणपणे आठ दहा वेळा तरी थप्पड खावी लागते. आपण म्हणतो की त्याचे काही एवढे वाटत नाही, पण ज्याला थप्पड बसते त्याला ती फार अपमानास्पदच वाटते. म्हणून तर "थोबाडीत देणे" हा प्रकार इतका मोलाचा असतो. एखाद्या पोरीने मुलाला थप्पड दिली की तो त्या दिशेने कधी जाणार नाही, इतकी ही थप्पड प्रभावी असते. कायद्याने हा हल्ला मानावा, तर ह्यात फारशी काही शारिरिक इजा होत नाही. ही काही फार गंभीर हिंसा नसते. शारिरिक दु:खापेक्षा अपमानच ज्यास्त असतो. कोणत्याही वादावादीत अगदी जालीम प्रत्युत्तर म्हणजे "थोबाडीत देणे" हेच असते. आपण ते नेहमीच देऊ शकत नाही, हा भाग वेगळा. पण कित्येक वेळा वादाची परमावधी थोबाडीत देण्यात व्हावी असे आपल्याला नेहमीच वाटते. केवळ ह्याच सामाजिक परिणामामुळे मराठी शब्दकोशात "थोबाडीत देणे" ह्याचा अर्थ "चांगली अद्दल घडविणे" असाही देतात.
आपण ज्याला थोबाडीत देतो त्याचा अपमान करीत असतो. आता ह्या हरविंदर ह्या गृहस्थाने मागच्याच आठवड्यात सुखराम ह्या ८६ वर्षांच्या माजी मंत्र्याला थोबाडीत दिले होते. कोण आहेत हे सुखराम. हे फार पूर्वी दूर-संचार मंत्री होते. ह्यांच्यावर नाना भ्रष्टाचाराचे आरोप झाले. सीबीआयची रेड पडली तेव्हा ह्यांच्या घरात इतके पैसे होते की, ते ठेवायला ह्यांच्या घरी कपाटे अपूरी पडल्याने चार पाच कोटी रुपये चादरीत गुंडाळून देवघरात ठेवलेले सापडले होते. त्यानंतर त्यांच्यावर रीतसर खटले भरून आता ८६व्या वर्षी ह्यांना ५ वर्षांची शिक्षा झाली आणि त्यांना तिहार जेलमध्ये राजाच्याच कोठडीत ठेवले आहे. अशा माणसाला कसला आला आहे मान आणि अपमान. आता अशा निगरगट्ट भ्रष्टाचार्‍याला कोणी थोबाडीत दिले तर अजून काय मोठा अपमान होणार आहे ? खरे तर तो थोबाडीत देण्याचाच अपमान होईल. जेव्हा काही अघटित घडते तेव्हा आपण म्हणतो की "मेरूला मुंग्यांनी तर गिळले नाही ना" ? तर अशीच परिस्थिती सध्याच्या राजकारणात आलेली आहे. वाईट माणसांनी चांगल्यांची इतकी गळचेपी केलेली आहे की अशांना थोबाडीत दिली तर ती थप्पड मारण्याचाच अपमान व्हावा.
थप्पड खाल्लेला माणूस त्यावर काय प्रतिक्रिया देतो त्यावरून त्या माणसाची नीतीमत्ता दिसून येते. शाळेतला एखादा कोडगा मुलगा असेल तर तो हमखास थोबाडीत दिल्यावरही म्हणेल "काहीच लागले नाही !". एखाद्याचा खरेच अपमान झाला असेल, तर तो चक्क रडेलच. थप्पड खाणार्‍याला राग तर हमखास येतोच. आता त्यावर तो बदला घेवो अगर न घेवो, पण राग आलाच पाहिजे. एवढी वर्षे मानाची पदे भूषविल्यावर, जीवनाच्या शेवटी कोणावर थोबाडीत खाण्याचा प्रसंग यावा ह्याचा खरे तर रागच यायला हवा. कोणी साने गुरुजींचा वा येशू ख्रिस्ताचा अवतार असेल तर ती गोष्ट वेगळी व त्याने जरूर म्हणावे की "ह्या वेड्याला तो काय करतोय ते कळत नाही म्हणून हे देवा तू ह्याला माफ कर". तर तो भाग वेगळा. पण ह्या वयातही जे निरनिराळ्या लव्हासासारख्या योजनांच्या आकांक्षा बाळगून आहेत, राजकारणातल्या धामधुमीत अजूनही व्यस्त आहेत, त्यांना ह्याचा रागच यायला हवा होता. त्यांनी लगेच ट्विटरवर असे का म्हणावे, की "लोकशाहीत प्रत्येकाला आपले म्हणणे मांडण्याचा हक्क आहे, फक्त तो रास्त मार्गाने मांडावा !" आता थोबाडीत देणारा काय आपले म्हणणे मांडत असतो काय, की जे आवाजी मतदानाने तुम्ही ते नेहमीच फेटाळून लावू शकता ? त्याचे थोबाडीत देणे हा त्याने दिलेला सणसणीत निकाल असतो. आम्ही चर्चेला तयार आहोत असे सत्ताधारी पक्षाने म्हणणे हे नेहमीच त्यांची समजूत दाखवते असे नसून सध्याच्या काळात ती "तुम्ही काहीही मांडा, आम्हाला काही फरक पडत नाही" अशी सत्तेची उद्दाम मग्रूरीच ते वागण्याने दाखवीत असतात. सामाजिक काम करणार्‍याने, "हे चालायचच" असं म्हणून कोडगे होता कामा नये. जनाची नाही तर मनाची थोडी राखायलाच हवी व आपल्या वागण्याची तपासणी करून परत कोणी असे करू धजणार नाही असे वागणे हवे ! हे कोणा माथेफिरूचे काम नसून तुमच्या वर्तुणुकीवर उमटलेला दैवी संकेत आहे असेच हे समजायला हवे !

-------------------------------------------------