निर्भीड व्हा---३८
-------------------
सोनिया राहूल ह्यांची अप्रतीम खेळी !
-----------------------------------
आधी "हिंदू-आतंकवाद" कसा आहे, त्यात सात-आठ माणसे कसे आरएसएसचे आहेत असे सुशिल शिंदे ह्यांनी म्हणायचे, आणि जे गेल्या चार वर्षांपासून पकडलेले आहेत त्यांच्यावर कोर्टात कुठलीही कारवाई करायची नाही. साध्वी प्रज्ञासिंग हिच्या प्रकृतीची तर इतकी सरकारी हेळसांड केलेली आहे की बिचारीला आता कॅसरच झाला आहे. एका कॅंसरवाल्या बाईला परदेशी जाऊन उपचार घेता येतात तर दुसरी ही बाई उपचार घ्यायलाही सोडली जात नाही. शिवाय आतंकवादाचा इतका गंभीर गुन्हा आहे तर मग इतकी वर्षे झाली अजून मुकदमा लादणे नाही, कोर्टातर्फे काहीही कारवाई नाही. कारण हे उघड उघड राजकारणाचे प्रकरण आहे व ते राजकारणासाठीच वापरायचे आहे. आता निवडणुका आल्यात तेव्हा भाजपची बोलती बंद करायला हे हिंदू-आतंकवादाचे प्रकरण छानच आहे.
अफजल-गुरू ला फाशी द्यायचे आधी १२ वर्षे टाळायचे आणि आता निवडणुकांच्या तोंडाशी पटकन् फाशी देऊनही मोकळे व्हायचे ह्यात फार अप्रतीम राजकीय खेळी आहे. खुद्द भाजप सुद्धा ह्या कारवाईची तारीफच करते आहे. त्यामुळे हिंदूंची मते जी दूर जात होती ती आता वळती करणे सुकर होईल ना !
आणि आता सर्वात वरचढ ठरणारी चाल ! भ्रष्टाचार विरोधाची ! त्याची मुहूर्तमेढ एक वर्षांपासून चाललेली होती व आता चांगला मुहूर्त सापडलाय, निवडणुकांचा. सगळे राजकीय पंडित जाणतात की कॉंग्रेसच्या विरुद्ध जे मत आहे ते भ्रष्टाचारांच्या घोटाळ्यांमुळे ! आता कितीही पुरावे दिले वगैरे तरी भ्रष्टाचार नाहीय असे कसे सिद्ध करायचे ? जे घोटाळे झालेत ते चौकशीच्या शुक्लकाष्ठाने लांबणीवर तर टाकलेच आहेत. पण त्याने भ्रष्टाचार झालाच नाही किंवा तो नव्हताच असे कसे सिद्ध करायचे ? तर आता हा मास्टर-स्ट्रोक पहा. अमेरिकेत, पाकिस्तानात, बांगला देशात, अफगाणिस्तानात, सोनियांच्या बोलाला काही मोल मिळेल असे काही आजचे राजकारण नाही. सगळ्या जगात असा एकच त्यांचा देश आहे, इटली, जिथे त्या आपल्या शब्दात काही सांगू शकतात. त्यांना मग तिथे काय अवघड आहे. बरे त्या काही अवैध करायला सांगत नाहीत. त्या म्हणताहेत की एका माणसाला अटक करा आम्ही सांगतो त्या माणसांची नावे घ्या व आमच्या सरकारला काही कागदपत्रेही देऊ नका. ज्यांनी काही केलेच नाही ते तर नंतर सुटणारच आहेत.
तर ही खेळी मास्टर-स्ट्रोक कशी ? तर काय होईल की आपण कारवाई केलीय हे ठळकपणे दाखवता येईल. संशयाची सुई पाहिजे त्यांच्याकडे दरम्यान वळवता येईल. आणि हे प्रकरण मिटवताना मुळात काही भ्रष्टाचार नव्हताच असे दाखविले की मग बोफोर्स, टू-जी, थ्री-जी, कॉमनवेल्थ असे अनेक घोटाळ्यांना ह्याचा फायदा मिळेल. निवडणुकीपूर्वी सगळे डाग फिके पडतील. आणि कॉंग्रेस नक्कीच निवडून येईल. चेक ऍंड मेट !
-----------------------------------------

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा