marathi blog vishva

सोमवार, १० ऑक्टोबर, २०१६

स्वेच्छा व कार्यकारण

स्वेच्छा व कार्यकारण

---------------------------

ही हैदराबादची तेरा वर्षाची मुलगी ६८ दिवस उपास करूनही तगली असती तर किती बरे झाले असते. पण तिचा उपास तपस्या ही खरेच स्वेच्छेने केलेली होती ? काय असते स्वेच्छा ?

जगातले जे पदार्थ आहेत त्यांना शास्त्राचे नियम लागू होतात व त्यांना निश्चित असे कार्य कारण असते. म्हणजे असे केले तर असे होईल. पण माणसाचे मन हे काही भौतिक पदार्थ नाही, मग त्याला असते का स्वेच्छा ?

आपण कपडे घालतो, चालीरीती आचरतो ते सगळे आपण न ठरवता दुसरेच ठरवतात. आणि त्यांचा इतका प्रचंड पगडा असतो की साधे अनवाणी कुठे जायचे तर ते आपल्याच्याने होत नाही, कपडे ( निदान बापूंसारखा सदरा न घालता ) न घालता तर दूरच.

पण आजकाल क्वांटम शास्त्रात हेही चूक ठरवतात. अणूच्यातल्या एका कणाची गती मोजायला गेले तर म्हणतात की त्या कणाचे निश्चित स्थान ठरवता येत नाही. जिथे शास्त्रातच अशी अनिश्चितता आहे तिथे माणसाच्या मनाचे कसे काय ठरवावे ? ६८ दिवसाचे उपासाचे तप करणे ही निश्चितच १३ वर्षाच्या कोण्या मुलीची स्वेच्छा प्रवृत्ती होऊ शकत नाही. हे निश्चितच त्या समाजाचे दडपण असावे.

आंता कोणाला हे दडपण स्वेच्छेने घ्यायचे असेल तर तसे कोणाला घेऊ द्यावे काय ? लहान मुलांना ह्यापासून नक्कीच आवरायला हवे. त्यांना असे करू देऊ नये.

नक्की ? बघा बुवा !

-------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा