marathi blog vishva

बुधवार, ४ ऑगस्ट, २०१०

निर्भीड व्हा---१६
अमेरिकेत महात्मा गांधी !

परमेश्वराचे दर्शन कुठे होईल त्याचा जसा नेम नाही तसेच आजकाल कोणत्या देशात काय नियम पाह्यला मिळेल त्याचा काही नेम नाही. इथल्या बातम्या पाहता महात्मा गांधी व त्यांचे विचार भारतात आढळण्यापेक्षा इथेच ज्यास्त पहायला मिळत आहेत, असे वाटते. बातमी अशी की कोणी एक बाई आहे, काळी. ती आपल्या तीन मुलांसह सध्या एका अलीशान घरात, २ हजार चौरस फुटाच्या, तीन बाथरूम्स असलेल्या, तीन बेडरूम्स असलेल्या, सोफा वगैरे फर्निचर असलेल्या घरात रहात आहे. ज्या अमेरिकेत सुबत्ता आहे तिथे ३००० डॉलर महिना कमावणार्‍या बाईने असल्या घरात राहणे ही बातमी कशी होऊ शकते असे आपल्याला प्रथम वाटते. पण तपशील वाचल्यावर कळते की इथे सेक्शन-८ नावाची एक सोय आहे. त्या अंतर्गत बाजारातले भाडे १४०० डॉलर असले तरी हया बाईला फक्त ७०० डॉलरच भरावे लागतात, बाकीचे सरकार भरते. घराचा मालक खाजगी आहे. त्याला भाडेकरू शोधण्य़ाची तसदी नाही, शिवाय सामान खराब केल्यास तक्रार केली तर भाडेकरू बदलून मिळतो. ह्या स्कीम खाली चार ते पाच हजारांची प्रतीक्षा यादी आहे, तर चार वर्षांनंतर नंबर लागतो. भाडेकरूला चांगल्या लोकवस्तीत रहायला मिळते ते वेगळेच.
असेच ठिकठिकाणी होमलेस( ह्यांना आपण निराधार म्हटले असते, म्हणजे भिकारीच ) शेल्टर्स नावाचे प्रकार आहेत. काही शेल्टर्स फक्त बायकांसाठी, तर काही पुरुषांसाठी. इथे चांगल्या पलंगावर ( फोल्डिंगचे ) अंथरूण पांघरूणासह रात्री झोपायला मिळते. काही शेल्टर्स मध्ये तिथेच, तर काही ठिकाणी आजूबाजूला, "सूप किचन" नावाचे मोफत अन्नालय असते. इंटरनेटवर इथल्या सोय़ी बघायला मिळतात. लहान मुलाला घेऊन अशाच शेल्टर्स मध्ये राहणार्‍या व नंतर लक्षाधीश होणार्‍या एका काळ्या माणसाच्या खर्‍या गोष्टीवर एक अप्रतीम इंग्रजी सिनेमा पाहिलेला आठवत असेल. ही इथली पद्धत पाहून महात्मा गांधींच्या मनात अंत्योदयाची जी कल्पना होती ती ह्यापेक्षा काही वेगळी नव्हती, हे सहजी पटावे. आपण भारतीय अभिनिवेषाने म्हणू की हे गांधींजींनी शिकविलेले आहे, पण मुन्नाभाई सिनेमातल्या गांधींना दर्शन द्यावे वाटले तर अशाच कुठल्या शेल्टर मध्ये ते भेट देतील व आपल्याला त्यांचे दर्शन आता अमेरिकेतच मिळेल, ते असे !

अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

Nirbheed Vhaa--16
Meet Mahatma in America
Like we cannot be shure as to where we would be able to meet God, we are similarly unsure about what system we may encounter in which country. When we read daily news here we feel likely to meet Mahatma Gandhi and his thoughts more here than in India. The news is about some black woman, who earns 3000 Dollars per month, but is staying at a palatial house of 2000 sq.ft. The house is having, the news says, 3 bed rooms, 3 bathrooms, nice furniture like sofa, carpet etc, and is in good localilty. The tenant lady pays only 700 Dollars a month and the rest is paid through subsidy from federal govt. This they say is under Section-8 provision. There are some 4000 tenants waiting under this scheme and it takes them 4 yrs to get such houses. The house owner is a private person and he gets an assured tenant and rent.
There are enough Homeless Shelters ( for these homeless, we would have called beggars in India ) around. These have folding cots and provide bed and linen. Mostly or sometimes at nearby place they also run "Soup Kitchens" where free food is provided. You must have seen a movie, based on a real story, of a black man living in such shelters alongwith his small child and becomes a millionaire later on.
Since we don't believe in re-incarnation we may not meet Mahatma Gandhi now in India, but like Munnabhai movie if the Mahatma ever thinks of visiting any place it would be some such Shelter as it befits his ideals of Sarvodaya ( the last man has to rise ). And if ever we meet such Mahatma , it could be here in America !


Arun Anant Bhalerao
arunbhalerao67@gmail.com

1 टिप्पणी:

  1. अमेरिकन सिनेटर चार्ल्स शुमरने आघाडीची भारतीय आयटी कंपनी इन्फोसिसबाबत वापरलेल्या अपशब्दांबाबत काहीतरी अपेक्षित आहे आणि त्याच अनुषंगाने विसा साठीची शुल्कवाढ यावरहि

    उत्तर द्याहटवा