निर्भीड व्हा---१८
कंपन्या व सामाजिक बांधीलकी
इथले एक प्राध्यापक श्री.अनील करनानी ह्यांनी वॉल स्ट्रीट जर्नल मध्ये एका नवीन वादाला तोंड फोडले आहे. त्यांच्या मते कंपन्यांना फायदा कमावणे हाच एकमेव हेतु असतो व सामाजिक बांधीलकी वगैरे सब झूट असते.
जगातले सर्वात श्रीमंत गृहस्थ श्री.बिल गेट्स ह्यांचे उदाहरण घेतले तर एक गंमत पहायला मिळते. अवघ्या १६/१७ व्या वर्षी कॉलेज शिक्षण सोडून संगणक कंपनी हा मुलगा सुरू करतो, पेटून एका ध्यासापायी जगातला अव्वल श्रीमंत होतो, आणि आता स्वत:च्या मुलांसाठी अगदी मोजकी संपत्ती ठेवून, जगातला सर्वात मोठ्ठा दानशूर होतो. भारतात दारिद्र्यनिर्मूलनाचे व एड्सचे ह्यांचे प्रचंड कार्य चालते. जेव्हा ते कंपनी चालवीत होते तेव्हा संगणक हेच त्यांचे सर्वस्व होते. इतके की ते सहकार्यांवर ओरडत की इतका मूर्खपणा मी कधी पाहिला नाही, किंवा कंपनीचे ऑप्शन्स विकून तुम्ही जागतिक शांतता पथकात का नाही सामिल होत ? हाच गृहस्थ आता म्हणतो की सर्व जीवांना समान मान मिळायला हवा व सर्वजण माझे बरोबरचे भागीदार आहेत. आणि इतके करूनही ते आता जरी निवृत्त झालेले असले तरी त्यांच्या अध्यक्षतेखालची त्यांची कंपनी प्रचंड नफा कमावणारीच म्हणून ओळखल्या जाते.
जरी त्यांचे शिक्षण त्यांना अर्धवट सोडून द्यावे लागले तरी अजूनही संगणक व विज्ञानात त्यांचा अभ्यास प्रचंड ताकतीचा असून त्याबद्दल त्यांना जागतिक मान सदैव मिळत असतो. ते राहतातही फार साधेपणाने. श्रीमंतांचे राहणे आपण टीव्हीवर कौतुकाने पहात असलो तरी ह्यांचे साधे राहणे लोकांना मोह घालते. आता जाणवणारी त्यांची सामाजिक बांधीलकी ही खरी म्हणायची की अजूनही कंपनी व्यवहारातली ह्यांची नफेखोरी खरी समजायची हा पेच आपल्याला पंचायतीत टाकतो.
भारतातल्या प्रत्येकाला सदरा मिळेल तेव्हाच मी शर्ट घालीन असे सामाजिक बांधीलकीने व्रत पाळत जन्मभर उघडे राहणारे गांधीजी ह्यांना आपण ह्या बांधीलकीच्या सन्मानार्थच "महात्मा" म्हणतो. असे महात्मापण बिल गेट्स ह्यांना मिळणारे नसले तरी त्यांची आत्ताची सामाजिक बांधीलकीची जाणीव आपण थोटी ठरवू शकत नाही.
शेवटी समाज हा एखाद्या जगन्नाथाच्या रथासारखा असतो. तो सर्वांनाच ओढायचा असतो. काही जण खूप जोर लावतात पण त्याने रथाची गती तेव्हढीच राहते, तुम्ही बिडी-काडी साठी क्षणभर बाजूला उभे राहिलात तरी रथ चालूच असतो. फक्त तुम्ही त्याच्या मार्गात सुरुंग पेरू नयेत, पाचरी मध्ये मध्ये घालू नयेत म्हणजे झाले. गरीब शेतकरी कर्जाच्या बोझ्या पायी आत्महत्या करतो, पण कृषी मंत्र्याच्या मालमत्तेला हात लावीत नाही, ह्यात गरीबांची सामाजिक बांधीलकी ज्यास्त दिसून येते, व कृषीमंत्र्यांना सारखे माझी मालमत्ता कशी नाहीय, असे सांगत राहावे लागते त्यात त्यांच्या नसलेल्या बांधीलकीचे दर्शन होते. उद्या जर कृषीमंत्र्यांनी बिल गेट्स सारखा मोठ्ठा निधी उभारला तर जरी शंभर उंदीर खाऊन झाल्यावर हजला निघालेल्या मांजरीसारखे ते भासले तरी आपल्याला त्यांची बांधीलकी मानावीच लागेल. पण तोपर्यंत आत्महत्या करणार्या शेतकर्याच्या, कायदा हातात न घेण्याच्या सामाजिक बांधीलकी बद्दल सर्वांनाच ऋणी राहावे लागेल. जगातल्या गरीबांची अशी सामाजिक बांधीलकी, हेच जगातल्या श्रीमंतांचे रहस्य आहे. कंपन्यांना आपण भरपूर नफा करू देतो ह्यात गिर्हाइकांची सामाजिक बांधीलकी आहे. कंपन्यांची नव्हे !
अरूण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com
Nirbheed vha---18
Companies & their Social Responsibilities
Mr.Anil Karnani has opened up a controversy over companies not having social responsibilities and how that is necessary for efficiency, in an article in recent Wall Street Journal.
When we look at the richest man Mr.Bill Gates, it makes an interesting situation. When he was running the company, which he founded at an early age, he was passionate about the computers, innovation and maintaining the lead in the trade. Now he is not only the richest man, but a great philanthropist, and talking about only social responsibility. He was so ruthless when he was leading the company that he used to tease his subordinates by demeaning remarks such as : "This is the stupidest thing I have ever seen, or Why don't you sell your options and join the peace core ?" And now, he proudly declares that his guiding principle is humility, equal honour for everybody and treating everybody as respected colleague. We are at a loss to understand whether his passion for profits was paramount or his social outlook is laudable now !
When Gandhiji decided to shun the shirt till everybody gets one to wear, we very clearly see the ultimate and pure social responsibility without any shades . Perhaps that is why we call him "Mahatma" for the same.
Society, I think, is like a Jagannath's Chariot. Everyone is required to pull it. Those who pull it with full fury and passion still can't make it gallop greatly and those who take a little bit of rest from pulling it, does not slow it down. Only thing is that keeps at a normal speed unless someone does not spread mines underneath or put wedges in its path.
Farmers who committ suicide due to poverty, instead of thinking snatching part of the properties of the Agriculture Minister, show in fact a remarkable sense of social responsibility which the Agriculture Minister lacks when he has to take pains in convincing that he does not own huge properties. If he makes a huge fund for farmers as comparable with Bill Gates , then even if it appears as the cat going to Haj after eating hundred rats, we may have to concede social responsibility to the Minister. But till then the farmers suicides ( and not snatching properties forcibly ) should paint the social responsibility of theirs,in bold colours. In fact, this could be the secret of all rich people that the poor show their social responsibility by allowing them to become rich. Companies do prosper at the cost of willing customers and it is their(customers') social responsibility that we should praise !
Arun Anant Bhalerao
arunbhalerao67@gmail.com
भालेराव साहेब,बिल गेटस हयांनी कंपनीला नफ़्यात आणुन नंतर ते समाजसेवेकडे वळाले ना.सगळीच मोठी लोक मात्र तस करीत नाहीत त्यामुळे असे करणारे जे थोडे आहेत त्यांची सामाजिक बांधीलकी खरच मानायला हवी.जर ते कमावणारच नाही तर लोकांची मदत कशी करणार.आता बघा एखाद्या ट्रेनमध्ये तुम्ही धावतपळत एखादी जागा पकडली आणि नंतर एखाद्या म्हातार्या गॄहस्थाला दिलीत तर ते सत्कार्य झाल पण त्यासाठी आधी तुम्हाला ती जागा मिळवायला लागली ना...तसेही आयुष्यात काही जण कधीच समाधानी होत नाहीत तर काही बर्यापैकी स्थेर्य लाभल कि समाजसेवेकडे वळतात.
उत्तर द्याहटवासमाज बांधणारे नेहमी अशी रचना करतात की एक जण सुधृड झाला की सर्व सोय़ी त्याला सहजी मिळतात. त्याने श्रीमंत व्हावे व मग समाजसेवेकडे वळावे ह्यापेक्षा गरीबालाही त्याच सोयी मिळाव्यात अशी रचना नसतेच. माणसाचा मेंदू सुद्धा चांगला खुराक मिळाला तरच हुशार होतो, मग गरीबांचा कसा होणार ? गरीब दुसर्याचा खुराक ओरबाडून घेत नाहीत किंवा त्यासाठी अडून बसत नाहीत हा त्यांचा भित्रेपणा का निष्काळजीपणा ? ओबामांनी गरीबांनासुद्धा हेल्थ केअर मिळावी असा प्रस्ताव ठेवला तर तो श्रीमंतांना मंजूर होत नाही, ते त्याला विरोध करतात. ह्यात साम्यवाद आणण्या पेक्षा सामाजिक बांधिलकी गरीब दाखवतात तशी श्रीमंतांनी सुद्धा दाखवायला हवी !
उत्तर द्याहटवाभालेराव साहेब,अगदि बरोबर श्रीमंतांना जश्या बरयाच सोयी आपोआप मिळतात तश्या गरीबांना मिळत नाहीत.श्रीमंतांनी ही सामाजिक बांधीलकी दाखवायला हवी तशी दाखवणारे लोकही आहेत आपल्या इथे पण त्यांच प्रमाण खुप कमी आहे.आता मुंबईचच उदाहरण घेतलत तर तिथे तुम्हाला टाटा आणि रिलायंस हयांच्या विजदरात चांगलाच फ़रक दिसेल.माझा आतेभाउ टाटा पॉवर मध्येच आहे त्याला ह्या संबधी विचारल असता तो म्हणाला सध्या ते जी वीज पुरवत आहेत ती ऑलमोस्ट नो प्रॉफ़ीट-नो लॉस तत्वावर...गरीबांसाठी मोफ़त कॅन्सर उपचारासारखे बरेच कार्यक्रम टाटांनी राबविले आहेत.आज सर्व उद्योजकांनी टाटांसारखी सामाजिक बांधीलकी दाखवण्याची खरच गरज आहे.
उत्तर द्याहटवाबाकी नेत्यांबद्दल तर बोलायलाच नको .आजच्या परिस्थीतीला सर्वात जास्त कारणीभुत तेच आहेत.भारतातील जनतेच्या खिशातील पैसा हया लोकांनी तिथे स्वीज बॅंकेत कुजत ठेवला आहे.जो आपल्या देशाच्या एकुण आर्थिक तुटीपेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे.आणि वर हयांना आता भरमसाठ पगारवाढ हवीये.गेल्या वर्षी बर्याच क्षेत्रात पगारवाढीसाठी आंदोलन झाली तेव्हा हयाच सरकारने खुप लोकांवर कठोर कारवाई केली.आणि आता हे लोकच संसदेत आंदोलन करताहेत पगारवाढीसाठी वा...आपल्या कृषीमंत्री तर सर्वात धन्य आहेत..सध्या महागाई आणि भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकलेल्या सर्वसामान्य जनतेच्या सहनशीलतेचा अंत आता हे लोक पाहत आहेत.आणि जर हे गरीब लोक पेटुन उठले तर त्यातुनच एक मोठी क्रांती अपेक्षीत आहे...
उत्तर द्याहटवा