marathi blog vishva

शुक्रवार, २७ ऑगस्ट, २०१०

निर्भीड व्हा---१९

नीतीची उत्क्रांती

सगळ्यांचा असा समज आहे की अमेरिकेत पैसा हेच सर्वस्व असून त्यामागेच ते धावताहेत. वॉल स्ट्रीट जर्नल हे तर बोलून चालून शेअर्स वाल्यांचे. आणि त्यात "उत्क्रांतीच्या मानस शास्त्रा " संबंधी इतकी सखोल बातमी, चर्चा यावी हे खूप आश्चर्याचे आहे.

बातमी अशी की कोणी प्रोफेसर, मार्क हाउझर नावाचे, हार्वर्ड विद्यापीठात होते. ते शिकवीत उत्क्रांतीचे मानसशास्त्र. ह्यात त्यांना असे दाखवायचे होते की माणसाचे नीतीमत्तेचे विचार हे निसर्गत: उत्क्रांत झाले आहेत व ते वैज्ञानिक पद्धतीने आपण मांडतो आहोत असे दाखवण्य़ासाठी त्यांनी काही माकडांवर प्रयोग केले व त्यातून नीतीमत्तेचे विचार कसे उत्क्रांत झाले आहेत, हे साधार दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आता इथवर तरी काही वावगे वाटत नाही. पण पुढे म्हटले आहे की त्यांना विद्यापीठाने तीन वर्षांच्या प्रदीर्घ चौकशीनंतर, अवैज्ञानिक पवित्रा बाळगल्याबद्दल,दोषी ठरवले आहे. ते सध्या एक वर्षाच्या रजेवर गेले आहेत. म्हणजे जवळ जवळ काढूनच टाकल्यासारखे.

अशा काय माकडचेष्टा ह्या महाशयांच्या अंगलट आल्या ? तर असे कळते की त्यांनी माकडांच्या प्रतिक्रिया आपल्याला पाहिजे तशा प्रयोगात बदलवून घेतल्या, त्या खर्‍या नव्हत्या. हार्वर्ड विद्यापीठाची ही फारच काटेकोर वैज्ञानिक जाणीव आपल्याकडे तर धसकाच आणणारी वाटेल. आपण पीएचड्यांचे प्रबंध चोरून डॉक्टर करतो आणि इथे एका प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञाला प्रयोगात खोडसाळपणा केल्याबद्दल इतकी दखल ! बरे ह्या गृहस्थांचे बर्‍यापैकी नाव आहे, "मॉरल माइंडस" नावाचे एक पुस्तक गाजलेले आहे, इंटरनेट वर "मॉरल सायन्स टेस्ट" नावाची एक टेस्ट ह्यांची प्रसिद्ध आहे ( सध्या ती काढलेली आहे ) आणि हे बर्‍यापैकी गाजलेले आहेत. पण नुसते त्यांनी आपले मत म्हणून हे मांडले असते तर मानसशास्त्रासारख्या कलाविषयात हे धकण्यासारखे होते. पण त्याचे शास्त्र करायचे, प्रयोग करायचे व त्यात खोटेपणा करायचा ह्याने हार्वर्डसारख्या विद्यापीठाला नक्कीच बट्टा लागल्यासारखे आहे. विज्ञानाची इतकी मानमराबता वाखाणण्यासारखी तर आहेच, शिवाय अर्थव्यवस्थेने इतके त्रस्त केलेले असताना वॉल स्ट्रीट सारख्या वर्तमानपत्राला ह्या बातमीचे अप्रूप वाटावे व ते त्यांनी सविस्तर समजून सांगावे ही सुद्धा अपार कौतुकाची बाब आहे.

पैशासाठी पदोपदी नीतीमत्ता पायदळी घेणार्‍या अमेरिकेला आपली नीतीमत्ता कशी बनते ह्याचा अभ्यास शास्त्रीय काटेकोरपणे व्हावा असे वाटावे हीच खूप महान नीतीची गोष्ट आहे व त्यासाठी त्यांचे अभिनंदन करावे तितके कमीच आहे !

अरूण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

Nirbheed Vha----19 ( Be Bold ! )

Valuing Evolutionary Psychology

We presume that whole America is in hot pursuit of money and wealth. And Wall Street Journal, as the name suggests should be all about money. On such a background it is refreshing thought to see that it has given such a prominant space for a news about Evolutionary Psychology.

The news is about virtual sacking of one professor, Mr. Marc Hauser, of Harvard University, for his scientific misconduct on eitht counts. The professor has already confessed of a "mistake" and has proceeded on one years leave of absence. This professor was quite popular in Psychology circuit through his book "Moral Minds: How Nature designed our universal sense of right & Wrong" and various tests on internet. What the professor was trying to do in the university through research on monkeys is that our sense of morals has been developed through the evolution and it does not owe the pressures from relijgion, society or reason. While managing the experiments, it turned out that he manipulated the reactions of the monkeys to suit the conclusions, which is a moral sin in Science. What is so noteworthy in the episode is that while the natiion is going through economic and social turmoil, the newspaper values the upkeep or morals of Universily, thereby nurturing the scientific fabric in the society. All the kudos to the Wall Street Journal and Harvard University for such high standards !

When in everyday pursuite of money, in various walks of life, we find the scant attention we give to morals and its evolution, it is so heartening to see that the newspaper has taken lot of space and efforts in explaining why morals have to be kept upright whether they are evolved through nature or otherwise !

Arun Anant Bhalerao
arunbhalerao67@gmail.com

मंगळवार, २४ ऑगस्ट, २०१०

निर्भीड व्हा---१८

कंपन्या व सामाजिक बांधीलकी

इथले एक प्राध्यापक श्री.अनील करनानी ह्यांनी वॉल स्ट्रीट जर्नल मध्ये एका नवीन वादाला तोंड फोडले आहे. त्यांच्या मते कंपन्यांना फायदा कमावणे हाच एकमेव हेतु असतो व सामाजिक बांधीलकी वगैरे सब झूट असते.

जगातले सर्वात श्रीमंत गृहस्थ श्री.बिल गेट्स ह्यांचे उदाहरण घेतले तर एक गंमत पहायला मिळते. अवघ्या १६/१७ व्या वर्षी कॉलेज शिक्षण सोडून संगणक कंपनी हा मुलगा सुरू करतो, पेटून एका ध्यासापायी जगातला अव्वल श्रीमंत होतो, आणि आता स्वत:च्या मुलांसाठी अगदी मोजकी संपत्ती ठेवून, जगातला सर्वात मोठ्ठा दानशूर होतो. भारतात दारिद्र्यनिर्मूलनाचे व एड्सचे ह्यांचे प्रचंड कार्य चालते. जेव्हा ते कंपनी चालवीत होते तेव्हा संगणक हेच त्यांचे सर्वस्व होते. इतके की ते सहकार्‍यांवर ओरडत की इतका मूर्खपणा मी कधी पाहिला नाही, किंवा कंपनीचे ऑप्शन्स विकून तुम्ही जागतिक शांतता पथकात का नाही सामिल होत ? हाच गृहस्थ आता म्हणतो की सर्व जीवांना समान मान मिळायला हवा व सर्वजण माझे बरोबरचे भागीदार आहेत. आणि इतके करूनही ते आता जरी निवृत्त झालेले असले तरी त्यांच्या अध्यक्षतेखालची त्यांची कंपनी प्रचंड नफा कमावणारीच म्हणून ओळखल्या जाते.

जरी त्यांचे शिक्षण त्यांना अर्धवट सोडून द्यावे लागले तरी अजूनही संगणक व विज्ञानात त्यांचा अभ्यास प्रचंड ताकतीचा असून त्याबद्दल त्यांना जागतिक मान सदैव मिळत असतो. ते राहतातही फार साधेपणाने. श्रीमंतांचे राहणे आपण टीव्हीवर कौतुकाने पहात असलो तरी ह्यांचे साधे राहणे लोकांना मोह घालते. आता जाणवणारी त्यांची सामाजिक बांधीलकी ही खरी म्हणायची की अजूनही कंपनी व्यवहारातली ह्यांची नफेखोरी खरी समजायची हा पेच आपल्याला पंचायतीत टाकतो.

भारतातल्या प्रत्येकाला सदरा मिळेल तेव्हाच मी शर्ट घालीन असे सामाजिक बांधीलकीने व्रत पाळत जन्मभर उघडे राहणारे गांधीजी ह्यांना आपण ह्या बांधीलकीच्या सन्मानार्थच "महात्मा" म्हणतो. असे महात्मापण बिल गेट्स ह्यांना मिळणारे नसले तरी त्यांची आत्ताची सामाजिक बांधीलकीची जाणीव आपण थोटी ठरवू शकत नाही.

शेवटी समाज हा एखाद्या जगन्नाथाच्या रथासारखा असतो. तो सर्वांनाच ओढायचा असतो. काही जण खूप जोर लावतात पण त्याने रथाची गती तेव्हढीच राहते, तुम्ही बिडी-काडी साठी क्षणभर बाजूला उभे राहिलात तरी रथ चालूच असतो. फक्त तुम्ही त्याच्या मार्गात सुरुंग पेरू नयेत, पाचरी मध्ये मध्ये घालू नयेत म्हणजे झाले. गरीब शेतकरी कर्जाच्या बोझ्या पायी आत्महत्या करतो, पण कृषी मंत्र्याच्या मालमत्तेला हात लावीत नाही, ह्यात गरीबांची सामाजिक बांधीलकी ज्यास्त दिसून येते, व कृषीमंत्र्यांना सारखे माझी मालमत्ता कशी नाहीय, असे सांगत राहावे लागते त्यात त्यांच्या नसलेल्या बांधीलकीचे दर्शन होते. उद्या जर कृषीमंत्र्यांनी बिल गेट्स सारखा मोठ्ठा निधी उभारला तर जरी शंभर उंदीर खाऊन झाल्यावर हजला निघालेल्या मांजरीसारखे ते भासले तरी आपल्याला त्यांची बांधीलकी मानावीच लागेल. पण तोपर्यंत आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍याच्या, कायदा हातात न घेण्याच्या सामाजिक बांधीलकी बद्दल सर्वांनाच ऋणी राहावे लागेल. जगातल्या गरीबांची अशी सामाजिक बांधीलकी, हेच जगातल्या श्रीमंतांचे रहस्य आहे. कंपन्यांना आपण भरपूर नफा करू देतो ह्यात गिर्‍हाइकांची सामाजिक बांधीलकी आहे. कंपन्यांची नव्हे !

अरूण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

Nirbheed vha---18

Companies & their Social Responsibilities

Mr.Anil Karnani has opened up a controversy over companies not having social responsibilities and how that is necessary for efficiency, in an article in recent Wall Street Journal.

When we look at the richest man Mr.Bill Gates, it makes an interesting situation. When he was running the company, which he founded at an early age, he was passionate about the computers, innovation and maintaining the lead in the trade. Now he is not only the richest man, but a great philanthropist, and talking about only social responsibility. He was so ruthless when he was leading the company that he used to tease his subordinates by demeaning remarks such as : "This is the stupidest thing I have ever seen, or Why don't you sell your options and join the peace core ?" And now, he proudly declares that his guiding principle is humility, equal honour for everybody and treating everybody as respected colleague. We are at a loss to understand whether his passion for profits was paramount or his social outlook is laudable now !

When Gandhiji decided to shun the shirt till everybody gets one to wear, we very clearly see the ultimate and pure social responsibility without any shades . Perhaps that is why we call him "Mahatma" for the same.

Society, I think, is like a Jagannath's Chariot. Everyone is required to pull it. Those who pull it with full fury and passion still can't make it gallop greatly and those who take a little bit of rest from pulling it, does not slow it down. Only thing is that keeps at a normal speed unless someone does not spread mines underneath or put wedges in its path.

Farmers who committ suicide due to poverty, instead of thinking snatching part of the properties of the Agriculture Minister, show in fact a remarkable sense of social responsibility which the Agriculture Minister lacks when he has to take pains in convincing that he does not own huge properties. If he makes a huge fund for farmers as comparable with Bill Gates , then even if it appears as the cat going to Haj after eating hundred rats, we may have to concede social responsibility to the Minister. But till then the farmers suicides ( and not snatching properties forcibly ) should paint the social responsibility of theirs,in bold colours. In fact, this could be the secret of all rich people that the poor show their social responsibility by allowing them to become rich. Companies do prosper at the cost of willing customers and it is their(customers') social responsibility that we should praise !

Arun Anant Bhalerao
arunbhalerao67@gmail.com

रविवार, २२ ऑगस्ट, २०१०

निर्भीड व्हा---१७

मंदीर यही बनायेंगे !

बाबरी मस्जीद-राम मंदीर प्रकरण ऐकले की अमेरिकेतले लोक आपल्याला हसत असत. त्यांना वाटे एवढया पुढारलेल्या काळात काय हे लोक धर्माचा बाऊ करून बसताहेत. पण आता त्यांचाच मटका बसलाय. कारण ज्या वर्ल्ड ट्रेड सेंटरला आतंकवाद्यांनी जमीनदोस्त केले त्याच झीरो ग्राऊंडवर मशीद उभारण्याचा प्रस्ताव मुस्लिम समाजाकडून आला आहे. अगदीच त्याच जागी नसले तरी दोन कि.मी. अंतरावर मशीद व इतर स्मारक म्हणजे अमेरिकेच्या सहनशीलतेची कसोटीच आहे.

अमेरिकेचे नवीन अध्यक्ष बराक ओबामा हे मधल्या नावाने मुसलमान आहेत ह्याचा अमेरिकेला भारी अभिमान होता. त्यात मुस्लिम समाजाशी सौजन्याचे धोरण ठेवत ओबामांनी पहिलेच भाषण कैरोत करीत जे सौहार्दाचे आवाहन केले ते तर फारच प्रभावी होते. आता हेच आवाहन त्यांच्या अंगलट येत आहे. ज्या मुल्लाने एकेकाळी सीआयए ला मदत केली तोच आता ह्या मशीदीसाठी परवानगी मागतो आहे व मुस्लिमांच्या द्वेषाला अमेरिकाच जबाबदार आहे असे म्हणतोय. म्हणजे परत तो ज्यास्त प्रभावी धार्मिक बनला आहे. आता अमेरिका म्हणते आहे की तुम्हाला तुमची मशीद उभारण्याचा हक्क जरूर आहे पण इथेच का, व ह्यामागे कोणाचे पैसे आहेत तेही पाहिले पाहिजे.

ह्यासंदर्भात अयान हिरसी अली ह्या विदुषीचे मत आहे की तुम्ही कितीही आव आणलात तरी हटिंग्टन ने म्हटल्यासारखे मुस्लिम व ख्रिश्चन ह्या दोन संस्कृतींचाच हा लढा आहे. क्लॅश ऑफ सिव्हिलाइझेशन्स . अयान हिरसी अलीचे नोमॅड नावाचे स्वानुभाववरचे एक पुस्तक नुकतेच आले आहे. त्यात ती आफ्रिकेतून अमेरिकेपर्यंत कशी लढत आली व स्त्रियांवर अजूनही मुस्लिम समाजात कसे अत्याचार होताहेत ह्यासंबंधी अनुभवाचे बोल आहेत. तिच्या म्हणण्याप्रमाणे अमेरिकेतले सुधारलेले मुस्लिमही कोवळ्या मुलींची बेधडक सुन्ता करतात, फक्त कबूल करीत नाहीत. तिने एका ख्रिश्चन मिशनर्‍याला म्हटले आहे की तुम्ही भले धर्मांतरे नका करू पण मुस्लिम समाजाला जरा मवाळ करण्यासाठी ठोस व ठाम पावले उचलायला हवीत. नाही तर मुस्लिम समाज असाच धर्मवेडा राहील.

ग्राऊंड झीरो जवळ मशीद का नको त्याचे दृश्य कारण हे लोक असे देतात की धार्मिक सामंजस्याचे प्रतीक वाटण्यापेक्षा इस्लामच्या हिंसेच्या विजयोन्मादाचे ते ज्यास्त प्रतीक ठरेल. लॉस एंजेल्सला एक म्युझियम आहे, "सिमोन विझेंथॉल" ह्यांच्या नावाने. हे आहे म्युझियम ऑफ टॉलरन्स, सहनशीलतेचे संग्रहालय. तशी सहनशीलता आजकाल संग्रहालयात ठेवण्याचीच वस्तु झाली आहे. आपण पाहतोच की व्यवहार्य कारणांसाठी युरोपात सुद्धा अनेक ठिकाणी बुरख्यावर बंदी आणली आहे कारण धर्मापेक्षा स्त्रीला मानाचे प्रतीक करणे त्या त्या सरकारांना ज्यास्त महत्वाचे वाटते.

अमेरिकेत व्यवहारी असण्याला ज्यास्त महत्व आहे. सध्या कॅलिफोर्नियात एक प्रपोजल २३ नावाचे विधायक मतदानासाठी येत आहे. पूर्वी कबूल केलेले पर्यावरणाचे आकडे तूर्त बेकारी सुधरेपर्यंत लागू होऊ नयेत नाही तर उद्योग परत बाहेर जातील असा हा प्रस्ताव आहे व बर्‍याच मोठ्या कंपन्या ह्यासाठी करोडो खर्च करीत आहेत. म्हणजे पहा पर्यावरणाच्या विरुद्ध जाताना अमेरिकेला काही वाटत नाही कारण ते त्यांच्या व्यवहाराचे आहे.

भारतासाठी तर हे फारच महत्वाचे धोरण ठरावे. कारण भारतात मुस्लिम व हिंदू हाच संस्कृतींचा झगडा आहे. आणि हिंदू त्यांच्यातल्या असंख्य प्रवाहांमुळे फारच मवाळ तर मुळातच मुस्लिम ज्यास्त धर्मवेडे. मुस्लिमांच्याच भल्यासाठी हिंदूंनी ज्यास्त धर्मकठोर होणे जरूरीचे आहे. अर्थात त्यांची (मुस्लिमांची ) आर्थिक स्थिती, नोकरी व्यवसाय, संबंधी उदारमतवादी धोरण ठेवावेच लागेल. पण धार्मिक बाबीत हिंदूंनी आग्रही होणे आवश्यक ठरणारे आहे.

त्यासाठी बाबरी मस्जीद प्रकरणात माघार न घेता ठणकाऊन "राम मंदीर"चा मुद्दा लावून धरायला हवा, त्याच्याशिवाय मुस्लिम मवाळ होणार नाहीत, असे अमेरिकेतले उदारमतवादी धोरण पाहता वाटायला लागले आहे. इथले जनमत वर्ल्ड ट्रेड सेंटर जवळ मशीद होऊ देण्याच्य़ा पार विरुद्ध आहे व ते तसे ठणकावून सांगू लागले आहेत. मुस्लिमांना मवाळ होण्याचा हा चांगला मार्ग आहे !

अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

Nirbheed Vhaa---17

Raam Mandir Due to America !

Americans used to laugh at our age old issues of Babri Masjid--Raam Mandir thinking that we are not sufficiently secular as they think they are. But things are turning topsy turvy for them. A proposal for a Masjid near the ruins of World Trade Center ( Ground Zero ) has come up and has become the talking point all over America. And it is slowly revealing the thin veil of Secularism that America is presently wearing .
America, no doubt, accepts that Muslims have a right to have their place of worship wherever they want but having it so near to ground zero does not meet with their approval. Though the Mulla concerned was so friendly at one time that he used to help CIA but now they are questioning the sources of funds and the propriety of having the Masjid so near to Ground Zero. Now perhaps it is the rest of the world's turn to see the true colours of American Secularism.
In this context the views of Ayaan Hirsee Ali are quite interesting. She is presently in news due to her recent book "Nomad", which is her personal story of plight from Africa to America and tortures of Islaam. She is conceding in one interview that ultimately it is a clash of civilisations ( as claimed by famous book of Huttington's "Clash of Civilisations") and for the sake of Muslims she pleads that Cristians should show a strong posture which in her opinion will help Islaam to reduce ill-treatment to women. She tells us that even in America the so called educated muslims force circumcision on their girls though they do not admitt it.

One reason Americans give for opposing the mosque near Ground Zero, is that it will appear more as a symbol of victory of Islaam's violent acts, than the tolerance of Americans. In this context it is interesting to note that there is a Museum at Los Angels in the name of Simon Wiesenthal on the subject of "Tolerance". If we look around we may find that these days tolerance is a thing to be found in musems alone. Govts in Europe have already boldly banned the veil for Muslim ladies as they think it liberates them to the level of the freedom of other ladies, which these govts. value more important than relegious identity.
America has a tradition of foregoing what is ethical and ideal for the immediate and practical. Presently they are bringing a proposition-23 in California, by which they want to go back on the committed environmental values till the present un-employment rate goes sufficiently down. Big companies are openly spending money to say no to this proposal lest industries flee out of the state.

This line of thought of Ayaan Hirsee Ali is interesting on the background of India's cronic problem of Hindu-Muslim relations. We had been given to accept very low levels of religiousness, thinking that this could be called as secularism of Hindus and will help Muslims also to reduce their strong religious fervour. But history tells us that it has not. Perhaps Muslims must be viewing it as weakness of Hindus. Hence it is worth a try to be more agressive for Hindus and perhaps demand the Ram Mandir. Seeing the way of the world's most secular society i.e, american society is behaving boldly towards Muslims it is worth trying for Indian Hindus to adopt a stronger stance in the context of Hindu-Muslim relations !

Arun Anant Bhalerao
arunbhalerao67@gmail.com

शनिवार, २१ ऑगस्ट, २०१०

निर्भीड व्हा---१७

मंदीर यही बनायेंगे !

बाबरी मस्जीद-राम मंदीर प्रकरण ऐकले की अमेरिकेतले लोक आपल्याला हसत असत. त्यांना वाटे एवढया पुढारलेल्या काळात काय हे लोक धर्माचा बाऊ करून बसताहेत. पण आता त्यांचाच मटका बसलाय. कारण ज्या वर्ल्ड ट्रेड सेंटरला आतंकवाद्यांनी जमीनदोस्त केले त्याच झीरो ग्राऊंडवर मशीद उभारण्याचा प्रस्ताव मुस्लिम समाजाकडून आला आहे. अगदीच त्याच जागी नसले तरी दोन कि.मी. अंतरावर मशीद व इतर स्मारक म्हणजे अमेरिकेच्या सहनशीलतेची कसोटीच आहे.

अमेरिकेचे नवीन अध्यक्ष बराक ओबामा हे मधल्या नावाने मुसलमान आहेत ह्याचा अमेरिकेला भारी अभिमान होता. त्यात मुस्लिम समाजाशी सौजन्याचे धोरण ठेवत ओबामांनी पहिलेच भाषण कैरोत करीत जे सौहार्दाचे आवाहन केले ते तर फारच प्रभावी होते. आता हेच आवाहन त्यांच्या अंगलट येत आहे. ज्या मुल्लाने एकेकाळी सीआयए ला मदत केली तोच आता ह्या मशीदीसाठी परवानगी मागतो आहे व मुस्लिमांच्या द्वेषाला अमेरिकाच जबाबदार आहे असे म्हणतोय. म्हणजे परत तो ज्यास्त प्रभावी धार्मिक बनला आहे. आता अमेरिका म्हणते आहे की तुम्हाला तुमची मशीद उभारण्याचा हक्क जरूर आहे पण इथेच का, व ह्यामागे कोणाचे पैसे आहेत तेही पाहिले पाहिजे.

ह्यासंदर्भात अयान हिरसी अली ह्या विदुषीचे मत आहे की तुम्ही कितीही आव आणलात तरी हटिंग्टन ने म्हटल्यासारखे मुस्लिम व ख्रिश्चन ह्या दोन संस्कृतींचाच हा लढा आहे. क्लॅश ऑफ सिव्हिलाइझेशन्स . अयान हिरसी अलीचे नोमॅड नावाचे स्वानुभाववरचे एक पुस्तक नुकतेच आले आहे. त्यात ती आफ्रिकेतून अमेरिकेपर्यंत कशी लढत आली व स्त्रियांवर अजूनही मुस्लिम समाजात कसे अत्याचार होताहेत ह्यासंबंधी अनुभवाचे बोल आहेत. तिच्या म्हणण्याप्रमाणे अमेरिकेतले सुधारलेले मुस्लिमही कोवळ्या मुलींची बेधडक सुन्ता करतात, फक्त कबूल करीत नाहीत. तिने एका ख्रिश्चन मिशनर्‍याला म्हटले आहे की तुम्ही भले धर्मांतरे नका करू पण मुस्लिम समाजाला जरा मवाळ करण्यासाठी ठोस व ठाम पावले उचलायला हवीत. नाही तर मुस्लिम समाज असाच धर्मवेडा राहील.

भारतासाठी तर हे फारच महत्वाचे धोरण ठरावे. कारण भारतात मुस्लिम व हिंदू हाच संस्कृतींचा झगडा आहे. आणि हिंदू त्यांच्यातल्या असंख्य प्रवाहांमुळे फारच मवाळ तर मुळातच मुस्लिम ज्यास्त धर्मवेडे. मुस्लिमांच्याच भल्यासाठी हिंदूंनी ज्यास्त धर्मकठोर होणे जरूरीचे आहे. अर्थात त्यांची (मुस्लिमांची ) आर्थिक स्थिती, नोकरी व्यवसाय, संबंधी उदारमतवादी धोरण ठेवावेच लागेल. पण धार्मिक बाबीत हिंदूंनी आग्रही होणे आवश्यक ठरणारे आहे.

त्यासाठी बाबरी मस्जीद प्रकरणात माघार न घेता ठणकाऊन "राम मंदीर"चा मुद्दा लावून धरायला हवा, त्याच्याशिवाय मुस्लिम मवाळ होणार नाहीत, असे अमेरिकेतले उदारमतवादी धोरण पाहता वाटायला लागले आहे. इथले जनमत वर्ल्ड ट्रेड सेंटर जवळ मशीद होऊ देण्याच्य़ा पार विरुद्ध आहे व ते तसे ठणकावून सांगू लागले आहेत. मुस्लिमांना मवाळ होण्याचा हा चांगला मार्ग आहे !

अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

Nirbheed Vhaa---17

Raam Mandir Due to America !

Americans used to laugh at our age old issues of Babri Masjid--Raam Mandir thinking that we are not sufficiently secular as they think they are. But things are turning topsy turvy for them. A proposal for a Masjid near the ruins of World Trade Center ( Ground Zero ) has come up and has become the talking point all over America. And it is slowly revealing the thin veil of Secularism that America is presently wearing .
America, no doubt, accepts that Muslims have a right to have their place of worship wherever they want but having it so near to ground zero does not meet with their approval. Though the Mulla concerned was so friendly at one time that he used to help CIA but now they are questioning the sources of funds and the propriety of having the Masjid so near to Ground Zero. Now perhaps it is the rest of the world's turn to see the true colours of American Secularism.
In this context the views of Ayaan Hirsee Ali are quite interesting. She is presently in news due to her recent book "Nomad", which is her personal story of plight from Africa to America and tortures of Islaam. She is conceding in one interview that ultimately it is a clash of civilisations ( as claimed by famous book of Huttington's "Clash of Civilisations") and for the sake of Muslims she pleads that Cristians should show a strong posture which in her opinion will help Islaam to reduce ill-treatment to women. She tells us that even in America the so called educated muslims force circumcision on their girls though they do not admitt it.
This line of thought of Ayaan Hirsee Ali is interesting on the background of India's cronic problem of Hindu-Muslim relations. We had been given to accept very low levels of religiousness, thinking that this could be called as secularism of Hindus and will help Muslims also to reduce their strong religious fervour. But history tells us that it has not. Perhaps Muslims must be viewing it as weakness of Hindus. Hence it is worth a try to be more agressive for Hindus and perhaps demand the Ram Mandir. Seeing the way of the world's most secular society i.e, american society is behaving boldly towards Muslims it is worth trying for Indian Hindus to adopt a stronger stance in the context of Hindu-Muslim relations !

Arun Anant Bhalerao
arunbhalerao67@gmail.com

बुधवार, ४ ऑगस्ट, २०१०

निर्भीड व्हा---१६
अमेरिकेत महात्मा गांधी !

परमेश्वराचे दर्शन कुठे होईल त्याचा जसा नेम नाही तसेच आजकाल कोणत्या देशात काय नियम पाह्यला मिळेल त्याचा काही नेम नाही. इथल्या बातम्या पाहता महात्मा गांधी व त्यांचे विचार भारतात आढळण्यापेक्षा इथेच ज्यास्त पहायला मिळत आहेत, असे वाटते. बातमी अशी की कोणी एक बाई आहे, काळी. ती आपल्या तीन मुलांसह सध्या एका अलीशान घरात, २ हजार चौरस फुटाच्या, तीन बाथरूम्स असलेल्या, तीन बेडरूम्स असलेल्या, सोफा वगैरे फर्निचर असलेल्या घरात रहात आहे. ज्या अमेरिकेत सुबत्ता आहे तिथे ३००० डॉलर महिना कमावणार्‍या बाईने असल्या घरात राहणे ही बातमी कशी होऊ शकते असे आपल्याला प्रथम वाटते. पण तपशील वाचल्यावर कळते की इथे सेक्शन-८ नावाची एक सोय आहे. त्या अंतर्गत बाजारातले भाडे १४०० डॉलर असले तरी हया बाईला फक्त ७०० डॉलरच भरावे लागतात, बाकीचे सरकार भरते. घराचा मालक खाजगी आहे. त्याला भाडेकरू शोधण्य़ाची तसदी नाही, शिवाय सामान खराब केल्यास तक्रार केली तर भाडेकरू बदलून मिळतो. ह्या स्कीम खाली चार ते पाच हजारांची प्रतीक्षा यादी आहे, तर चार वर्षांनंतर नंबर लागतो. भाडेकरूला चांगल्या लोकवस्तीत रहायला मिळते ते वेगळेच.
असेच ठिकठिकाणी होमलेस( ह्यांना आपण निराधार म्हटले असते, म्हणजे भिकारीच ) शेल्टर्स नावाचे प्रकार आहेत. काही शेल्टर्स फक्त बायकांसाठी, तर काही पुरुषांसाठी. इथे चांगल्या पलंगावर ( फोल्डिंगचे ) अंथरूण पांघरूणासह रात्री झोपायला मिळते. काही शेल्टर्स मध्ये तिथेच, तर काही ठिकाणी आजूबाजूला, "सूप किचन" नावाचे मोफत अन्नालय असते. इंटरनेटवर इथल्या सोय़ी बघायला मिळतात. लहान मुलाला घेऊन अशाच शेल्टर्स मध्ये राहणार्‍या व नंतर लक्षाधीश होणार्‍या एका काळ्या माणसाच्या खर्‍या गोष्टीवर एक अप्रतीम इंग्रजी सिनेमा पाहिलेला आठवत असेल. ही इथली पद्धत पाहून महात्मा गांधींच्या मनात अंत्योदयाची जी कल्पना होती ती ह्यापेक्षा काही वेगळी नव्हती, हे सहजी पटावे. आपण भारतीय अभिनिवेषाने म्हणू की हे गांधींजींनी शिकविलेले आहे, पण मुन्नाभाई सिनेमातल्या गांधींना दर्शन द्यावे वाटले तर अशाच कुठल्या शेल्टर मध्ये ते भेट देतील व आपल्याला त्यांचे दर्शन आता अमेरिकेतच मिळेल, ते असे !

अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

Nirbheed Vhaa--16
Meet Mahatma in America
Like we cannot be shure as to where we would be able to meet God, we are similarly unsure about what system we may encounter in which country. When we read daily news here we feel likely to meet Mahatma Gandhi and his thoughts more here than in India. The news is about some black woman, who earns 3000 Dollars per month, but is staying at a palatial house of 2000 sq.ft. The house is having, the news says, 3 bed rooms, 3 bathrooms, nice furniture like sofa, carpet etc, and is in good localilty. The tenant lady pays only 700 Dollars a month and the rest is paid through subsidy from federal govt. This they say is under Section-8 provision. There are some 4000 tenants waiting under this scheme and it takes them 4 yrs to get such houses. The house owner is a private person and he gets an assured tenant and rent.
There are enough Homeless Shelters ( for these homeless, we would have called beggars in India ) around. These have folding cots and provide bed and linen. Mostly or sometimes at nearby place they also run "Soup Kitchens" where free food is provided. You must have seen a movie, based on a real story, of a black man living in such shelters alongwith his small child and becomes a millionaire later on.
Since we don't believe in re-incarnation we may not meet Mahatma Gandhi now in India, but like Munnabhai movie if the Mahatma ever thinks of visiting any place it would be some such Shelter as it befits his ideals of Sarvodaya ( the last man has to rise ). And if ever we meet such Mahatma , it could be here in America !

Arun Anant Bhalerao
arunbhalerao67@gmail.com