marathi blog vishva

मंगळवार, ३० ऑगस्ट, २०११

मुसलमानांचे वेगळेच जग !
एवढा प्रचंड जनसमुदाय अण्णा हजारेंच्या आंदोलनात लोटला, त्यात सगळे लोक प्रामुख्याने जन-लोकपाल विषयीच बोलत होते. काही जणांचा विरोध होता, ते तो का आहे, हे ते सांगत होते. जसे अरूणा रॉय ह्यांना वाटे की जन-लोकपाल मध्ये पंतप्रधान काही अटींवर येऊ शकतात. काही मुसलमान समर्थक मुद्दाम अण्णा हजारेंच्या हाताने रोजाचा उपवास सोडत होते. हा त्यांचा उपवास आंदोलनाचा उपवास नव्हता तर धार्मिक रोजाचा उपवास होता. असे दुसर्‍या कुठल्याही धर्माच्या समर्थकांनी केले नाही.
दिल्लीच्या जामा मशीदीचे सय्यद बुखारी ह्यांनी तर फतवाच काढला की "भारत माता की जय" व "वंदे मातरम्‌" ह्या घोषणा अण्णा हजारे व समर्थक देत आहेत व त्या इस्लाम विरोधी असल्याने मुसलमानांनी ह्या आंदोलनाला पाठिंबा देऊ नये. हे कोणा कॉंग्रेसवाल्याने घडवून आणलेही असेल. पण भारतात इतके धर्म आहेत त्यापैकी इस्लामलाच असे वाटले की धर्माच्या दृष्टीने हे आंदोलन इष्ट नसल्याने मुसलमानांनी तिथे जाऊ नये. इथे इस्लाम हा कायमच सगळ्यांपेक्षा कसा वेगळा असतो हे प्रकर्षाने दिसून येते. ह्या आंदोलनाला विरोध/मतप्रदर्शन बर्‍याच जणांनी केले ते जनलोकपालाच्या विविध अंगांबद्दल. पण धर्माच्या नावाने विरोध करणारा फक्त इस्लामच ! त्यांचे म्हणणे मातेला देवाचा दर्जा देता येत नाही, त्यामुळे आमच्या अल्लाचे महत्व कमी होते.
जेव्हा मोहमदाने हा धर्म सुरू केला तेव्हा त्याच्या आसपास ज्यू लोक होते व ते दाढी ठेवीत नसत व मिशा वाढवत असत. मोहमदाने आपले शिष्य वेगळे दिसावे म्हणून धर्मातच सांगितले की दाढी ठेवा व मिशा सफाचट करा.
आज जगातले सर्व लोक पाश्चात्यांचा पोशाख घालतात. कदाचित तो आजकाल वावरताना सोयीचा पडत असावा. पण एकटा इस्लाम असा धर्म आहे की जो सांगतो पायजमा, कुर्ता घाला, बायकांनी बुरखा घाला.
सर्व जग आजकाल दारू पिते तर इस्लाम सांगतो की दारू पिणे धर्माच्या विरुद्ध आहे.
सर्व जगाची अर्थव्यवस्था व्याज आकारून चालते. तर इस्लामिक अर्थव्यवस्थेमध्ये व्याज आकारणे निशिद्ध मानले आहे. व्याज न आकारणार्‍या त्यांच्या बॅंका फायदा तर करतात तर मग हे व्याज न आकारता कसे शक्य होते ? जगावेगळे करावे, हेच ह्यामागे तत्व आहे.
मुसलमानांच्या घरात सुद्धा संडास कोणत्या दिशेने असावा ह्याबद्दल इस्लाममध्ये फतवे दिले आहेत.
सगळ्या जगातल्या लोकांची प्रजोत्पादन क्षमता दरवर्षी कमी कमी होत आहे तर मुसलमान स्त्रिया दर स्त्रीमागे ज्यास्त मुले प्रसवत आहे.
सगळ्या जगात द्वीभार्या प्रतिबंधक कायदे आहेत, तर इस्लाम म्हणते तुम्ही दोन काय, चार लग्ने करू शकता.
जगातले सगळे कायदे स्त्रियांना समान वारसाहक्क देण्याच्या दिशेने आहेत तर इस्लामी सरकारे स्त्रियांना कमी लेखत आहेत.
जगातले सगळे कायदे स्त्रियांना संभोगासाठी त्यांच्या संमतीला महत्व देऊ करतात तर इस्लाम म्हणतो स्त्रियांनी पुरुषांना संभोग नाकारता कामा नये. अगदी बलात्कार झाला असेल तरी मुलांची जबाबदारी किंवा त्याचे पैसे दिले तर माफीही देतात.
जगातल्या बहुतेक भाषांच्या लिप्या डावीकडून उजवीकडे लिहितात तर मुसलमानांची उजवीकडून डावीकडे.
जगातले बहुतेक देव हे सगुण साकार रूपात भजले जातात तर मुसलमानांना प्रतिमेचे पूजन वर्ज्य आहे. एवढेच काय मोहमदाचे चित्रही काढण्यास छापण्यास मनाई आहे. काही ठिकाणी तर मुसलमान लोक स्वत:ची छायाचित्रेही काढण्याच्या विरुद्ध आहेत.
आजकाल आपण कुटुंबात आपापले जेवण आपल्या थाळीत घेऊन जेवतो, तर मुसलमान एकत्र एका थाळीत जेवणेच पसंत करतात.
जगात कुठेही गेलात तर तिथल्या देशाप्रमाणे आपल्याला कायदे पाळावे लागतात, तर मुसलमान कुठेही गेले तरी आपलाच कायदा पाहिजे ( शरियत ) असे इच्छितात.
बहुतेक धर्मात देवपूजा ही व्यक्तिगत बाब असते व ती पाहिजे त्यावेळेस करतात, तर इस्लामात नमाझ एकत्रच पढला पाहिजे असा आग्रह असतो. मग जागा अपूरी पडली तर जथ्था रस्त्यावर आला तरी ते समाजाला धकवून घ्यावे लागते.
मुसलमान व इस्लामचे वेगळेपणाचे वेड असे स्पष्ट दिसते !
-----------------------------------------------------------------------------------------------



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा