marathi blog vishva

गुरुवार, १४ जुलै, २०११

----------------------------------------------------------------------------------------------------

निर्भीड व्हा----२७
आतंकवादी हल्ले कसे थांबवावेत
मागच्या वेळेसचा आतंकवादी हल्ला झाला मुंबईवर, तेव्हा आपण एक कमांडोंचं पथक मुंबईत तसेच चार महत्वाच्या शहरात ठेवण्याचं ठरवलं होतं. त्याचं काय झालं. ते ह्यावेळेस कुठे होतं ? ते का नाही आलं ?
त्यावेळेस ठरलं होतं की सर्व गुप्तचर संघटना एकत्र येऊन माहीती संघटित करतील. एकाला कळलं की सगळ्यांना कळवतील. मग सगळेच दक्ष राहतील व हल्ले होणार नाहीत. असं ठरलं होतं तरी आता ह्यावेळेस परत आपण कसे गाफील राहिलो ?
इस्त्रायल सारखं आपणही त्यांच्या प्रदेशात बदला म्हणून का नाही हल्ले करीत ? म्हणजे त्यांना दहशत बसेल. आपण हे करीत नाही तरी पाकीस्तान राजरोस म्हणतय की त्यांच्याकडचे स्फोट आपणच घडवून आणतोय. आता समजा खरेच आपल्या सरकारनं असे हल्ले करायचे ठरवले तर ते किती गोपनीय ठेवावे लागतील. एका कानाचे दुसर्‍या कानाला कळले नाही पाहिजे. आणि तशात समजा एखादा कर्नल पुराणिक सारखा पकडल्या गेला तर सरकारला हल्ले करण्यापेक्षा हा हिंदू आतंकवादी बघा कसा समझौता एक्स्प्रेस वगैरेवर हल्ले करतोय असे म्हणणे ज्यास्त फायद्याचे ठरते. म्हणजे हल्ले गोपनीयतेने करायचे तर खबरदारी म्हणून मुसलमानांकडूनच करवावे लागतील. करतील मुसलमान असले हल्ले ?
समजा कसाबला आपण माफीचा साक्षीदार केले व सगळीकडे फिरविले व भाषण द्यायला लावले की ते कसे कसे हल्ले करतात वगैरे तर पुढच्या दहशतवाद्यांना अडचणी येतील. पण आपली व्यवस्था असे करू देईल.? आपण तर त्याला कोटी कोटी खर्चून सुरक्षा पुरवतो, त्याचा वाढदिवसही लक्षात ठेवतो. आपले मंत्री त्याची विचारपूस करतात. आधीच्याच अफझल गुरूला कैक वर्ष होऊन फाशी देत नाही, तर कसाबला कशी देणार ? म्हणजे आतंकवाद्यांना शिक्षा द्यावी हा मार्गही खुंटलाच.
बाळासाहेब म्हणतात त्याप्रमाणे लोकांनीच सरकारवर अवलंबून न राहता असेल त्याने आतंकवाद्यांना मारावे. असा मार्ग वाटतोय सोपा पण आतंकवादी कोण आहे हे कोणी ठरवायचे ? आणि तसे ठरवेपर्यंत तो सटकला तर ?
आतंकवाद्यांच्या बळींना प्रचंड मोबदला द्यावा असे काही सुचवतात. आता असे केले व आपलेच लोक ह्या मोबदल्यापायी त्यांना सुपारी द्यायला लागले तर ?
किंवा असे केले तर ! आपण नक्षलवाद्यांशी, माओवाद्यांशी नाही तरी बोलणी करतोच. त्यांना सोडतो. त्यांच्याशी हातमिळवणी करतो. त्यांना निवडणुकीतही प्रोत्साहन देतो. तसेच समजा इंडियन मुजाहिदीनशी बोलणी केली तर ? ते मागून मागून काय मागतील. इस्लाम, शरीयत कायदा, आरक्षण, किंवा चक्क पैसे ? आणि हे सर्व तर आपण सध्याही त्यांना देतोच की. घटनेत असो वा नसो, आरक्षणही आजकाल देतात. पंतप्रधानांचा कार्यक्रमच आहे की सर्वात आधी राष्ट्रीय संपत्तीवर हक्क आहे मुस्लिम अल्पसंख्यांकांचा . आपण श्रीनगर मध्ये अलगवादी जिलानींना राजाश्रयही देतो. ते म्हणाले तर सेना कमी करतो, मागे घेतो. आणि गुन्हेगारांबाबत आपला दृष्टिकोण बराच उदार आहे. आपल्या लोकसभेत केवळ खून, किडनॅपिंग च्या शिक्षा झालेले आजही ७६ खासदार आहेत, सगळ्या पक्षांचे धरून. तेव्हा मुजाहिदीनांचे आपल्याला विटाळ असण्याचे कारण नाही. बरे हिंदूंची मते तशी कुचकामीच. त्यावर प्रखर हिंदुत्ववादी पक्षही निवडून येत नाहीत. शिवाय अजून थोडयाच दिवसात हिंदू अल्पमतात येणारच आहेत, असे मुस्लिम व्यूहपटू म्हणतच असतात. हे आतंकवादी फार तर काय मागतील, की भारत पाकीस्तानात विलीन करा ! जगात असे काही घडतच नाही असे नाही. जर्मनी नाही का परत एक झाला. आणि आधीही आपण अखंड भारतच होतो की. पुन्हा एक झालो तर काय हरकत आहे, जर हकनाक बळी टळत असतील तर ? बरे असेही आपण आता निधर्मी झालोच आहोत. जर जिवित-हानी टळत असेल तर अजून सोडू या की आपापले धर्म !. नाही तरी इस्लामचा अर्थच म्हणतात "शांती" असा आहे. स्थापू या की शांती ! मग शांती एकच काय, चार चारही करता येतील !



------------------------------------------------------------------------------------------------

२ टिप्पण्या:

  1. आपण आणखी किती दिवस गाफील राहाणार आहोत ? असे हल्ले होत राहतील आणि आपले निरपराध लोक बळी जात राहतील. आपण व्यक्त केलेले विचार इतर मित्रांना अग्रेषित करत आहे.
    मंगेश नाबर.

    उत्तर द्याहटवा
  2. अफझल गुरूची फाशी अमलात यावी यासाठी आंदोलन उभे करणे शक्य आहे काय?

    उत्तर द्याहटवा