marathi blog vishva

गुरुवार, १ एप्रिल, २०१०

निर्भीड :३
संगोपन किंवा मुले अशी का निघतात ?

हुशार आई-वडिलांच्या पोटी मूर्ख मुले येतात तेव्हा प्रश्न येतो की मुले अशी का निघतात ?
ज्युडिथ रिच हॅरिस ह्या विदुषीचे ह्याबाबत एक प्रसिद्ध पुस्तक आहे : नर्चर ऍझम्पशन्स ( संगोपनातली गृहिते ). काय आहेत ही गृहिते ?
हुशारी हि आई-वडिलांकडून जन्माने येते, चांगल्या संगोपनाने मुले चांगली निघतात, चांगल्या शिक्षणाने मुले चांगली निघतात. ह्या लेखिकेचे संशोधनाअंती मत आहे की असे काही असत नाही. तिच्या प्रयोगात असेही आढळले की चांगल्या शिक्षकांचाही मुलांवर काही परिणाम होत नाही. जे पालक जाणीव पूर्वक मुलांना पुस्तके वाचून दाखवितात त्यांचाही मुलांवर काही परिणाम होत नाही. हे निष्कर्ष इतके घाबरविणारे आहेत की सगळ्या पालकांनी खडबडून जागे होत हे पुस्तक वाचायला हवे.
मग मुलांवर परिणाम होतो तरी कोणाचा ? तर समवयस्कांचा किंवा पीयर्स चा. अगदी चांगले वळण लावलेले मूल शाळेत जाता जाताच दुसरे काही चांगले शिकण्या ऐवजी टगी पोरे असतात त्यांचे पाहून "च्यायला, वाट लागली, शट-अप," व ईतर शिव्या सारखे शब्द पटकन शिकतात. ज्वलंत स्वातंत्र्य सैनिकाच्या घरी त्याचीच मुले वाढदिवशी दारूची पार्टी जेव्हा मनवतात तेव्हा ते अध:पतन नसते तर तो काळाचा महिमा असतो. कारण आईटी च्या तरुणांना थोडा विरंगुळा म्हणून पार्टी करणे रास्त वाटते.मग ईतरेजनांवरही त्याचा परिणाम होतो. इथे संगोपनात काही त्रुटी राहून गेल्या अशी आई-वडिलांनी खंत करण्यापेक्षा कोणाचा कसा परिणाम होतो ह्याची शास्त्रीय माहीती घेणे ज्यास्त श्रेयस्कर ठरते. ह्या गोष्टी पटायला फारच क्रांतिकारक आहेत.
ह्या उलट असे लेखिकेला आढळले की ज्यांच्या घरात खूप पुस्तके आहेत, ती त्यांनी वाचून नाही दाखवली व मुलांनी ती नाही वाचली तरी मुलांवर खूप चांगला परिणाम होतो. हे अमेरिकेतल्या एका कौंटीला इतके पटले की त्यांनी ट्र्क्स भरभरून मुलांना पुस्तके वाटली.
रोजच्या संसारातही असेच काहीसे आढळते. सर्व सासवांना वाटत असते की माझा मुलगा माझ्या ऐकण्यातला आहे. पण सून येताच त्या समवयस्क मुलीचा त्याच्यावर इतका परिणाम होतो की तो सहजी वेगळा होतो. निदान सामाजिक कल तरी तसा आहे.

---अरूण अनंत भालेराव.
भ्र: ९३२४६८२७९२

४ टिप्पण्या:

  1. आता मला आठवते कि पूर्वी वाईट संगत लागू नये म्हणून पालक जाणीवपूर्वक प्रयत्न करत असत. वाईट गोष्टी करायला फक्त डेरिंग ची आवश्यकता असते आणि चांगल्या गोष्टी करायला फक्त "चिकाटी व मेहनत"च लागते. यात जी गोष्ट ज्याला भावते तो ते करतो .......आणि चांगली - वाईट मुले निपजतात मुग ती हुशार आई वडिलांची असोत किंवा कसे ....
    एखादी गोष्ट - जसे दारू पिणे - तरुण वयात फारसे काही वावग वाटत नाही किंवा त्याचे आकर्षण असते पण तीच गोष्ट पोक्त(वय आणि मन) झाल्या वर मात्र अनावश्यक वाटते. त्यातहि मोठ्या मानसाच्य पोटी जन्मलेल्या मुलांना आपल्या वडलांचे मोठेपण जपणे, केवळ त्यांचे कर्तुत्व मोठे असल्या मुले अशक्य असते, वानगी दाखल महात्मा गांधीजी आणि हरीभाई. अशी अनेक उद्हारणे देता येतील. थोडक्यात काय तर चांगला वाईट या रेलेटीइव टर्म आहेत, प्रत्येक मानसामध्ये पोतेन्तिअल असते व तो ते वेळ आल्या वर सिद्ध करतोच.
    प्रभंजन

    उत्तर द्याहटवा
  2. प्रिय प्रभंजन,
    प्रतिसाद दिल्याबद्दल आभार.
    वेळ येणे म्हणजेच सामाजिक संस्करण होत असताना आजुबाजूच्या म्होरक्यांनी प्रभावित होणे. शिवाय वेळ आली आहे हे समजणे हे सुद्धा भाग्याचे आहे.तसेच चांगले वाईट ह्याची एक आंतरिक जाण प्रत्येकात असतेच, पण बर्‍याच वेळा आपणच आपले ऐकत नाही.
    --अरूण भालेराव

    उत्तर द्याहटवा
  3. Nirbheed madhle lekh manala patat nahiyet...karan akhadyaweles Paishala mahatwa[aadhichya lekh] aani sanskarranna nahi[aattacha lekh] ya 2 karnanmule asel. Asa wichar aikla tari nako watate. Ekach sangawese watate Nirbheed wha pan kashasathi he lakshat ghya...saglyanna todnyasathi ki sgalynna jodnyasathi...

    Nirbheed honyachi garaj aahe ka kharach?
    ka garaj aahe manus bannyachi?

    prem aani bhavna ya 2 goshti mansala pranyanpasun wegle kartat...tya japnyasathi Nirbheed wha....

    उत्तर द्याहटवा
  4. प्रिय मुक्ताफळे,
    सगळ्यांचे सगळेच पटते तर सगळेच सारखे-सारखे दिसले असते.
    माणूस जोडण्याची नड मनात येणे हेच माणूस विभागलेला आहे हे सांगते.
    कित्येक वेळा भीडे पोटी चित्र स्पष्ट दिसत नाही, तेव्हा निर्भीड झाले तर फावते.
    --अरूण अनंत भालेराव

    उत्तर द्याहटवा