marathi blog vishva

रविवार, १२ डिसेंबर, २०१०

निर्भीड व्हा-----१८
दिग्विजयाचे दिगहरण करा !
अंतुले ह्यांनी लोकसभेत जो तमाशा केला होता तसाच आता मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री व कॉंग्रेसचे महासचीव, श्री.दिग्वीजय सिंग करीत आहेत. त्यांच्या मते ते करकरेंना २६/११ च्या मुंबई हल्ल्याच्या ३ तास अगोदर फोनवर बोलले होते. आणि करकरेंनी त्यांना हिंदुत्ववादी अतिरेक्यांनी धमकी दिली होती असे सांगितले होते. असेच वक्तव्य राजदीप सरदेसाई ह्यांनी सुद्धा २६/११ च्या बातम्या दरम्यान केले होते. ह्या उलट विकीलीक्सच्या गौप्यस्फोटाप्रमाणे अमेरिकन राजदूत त्यांच्या अध्यक्षाला सांगतो की ह्या हल्ल्यात हिंदुत्ववादी अतिरेकी नव्हते, तरीही धर्माचे राजकारण अंतुलेमार्फत कॉंग्रेस सरकार करीत आहे. अमेरिकन राजदूत हे अध्यक्षाला का सांगत आहे ? कारण ह्या हल्ल्यात अमेरिकन नागरीक कामी आलेले आहेत व अमेरिकेत असा कायदा आहे की अमेरिकन नागरीक जिथे कुठे असेल तिथे त्याच्या सुरक्षिततेची जबाबदारी अमेरिकन सरकारची आहे. हा काही नुसताच पोकळ कायदा नाही तर त्याची अमलबजावणी अमेरिकन सरकार सार्‍या जगात करते हे मी स्वानुभावाने सांगू शकतो. आम्ही कॅनडाला जाताना आमचा ( भारतीय ) फॉर्म वेगळा व मुली व नातवंडांचा ( ते अमेरिकन नागरीक ) फॉर्म वेगळा भरावा लागला होता. ह्याच पद्धतीमुळे काठमांडूच्या ओलीत धरलेल्या विमानात किती अमेरिकन नागरीक होते ते त्यांना तात्काळ कळले होते. तसेच एका अमेरिकन पत्रकाराचा खून पाकिस्तानात झाला तेव्हा त्यांच्या सरकारने त्याचा शेवटापर्यंत तडा लावला होता.
अमेरिकेच्या राजदूता पुढे अंतुले व दिग्वीजय सिंगांचे म्हणणे कसे खोटे पडणारे आहे हे अजूनही दुसर्‍या उदाहरणाने बघता येईल. हिंदुत्ववादी अतिरेकी इतके जर खतरनाक असते की जे करकरेसारख्याचा परस्पर काटा काढू शकते तर मग त्यांना मिळणारी वागणूक व कसाबला मिळणारी वागणूक ह्यात सरकार फरक का करते आहे. साध्वी प्रज्ञा आजारी पडते तेव्हा तिला जे.जे. सरकारी इस्पितळात कोणालाही पाहता येईल अशा वार्डात ठेवण्यात येते तर कसाबसाठी कित्येक कोटी खर्च करून स्पेशल व्यवस्था करण्यात येते व शिवाय त्याची जातीने गृहमंत्री चौकशीही करतात. बरे हिंदुत्ववादी इतके जर सरकारवर दडपण आणणारे असते तर सुषमा स्वराज ह्यांनी लेखी देऊनसुद्धा थॉमस ह्यांची नेमणूक सरकार करू धजलेच नसते. सरकारात नसल्याने ज्यांचा दबाव येणेच शक्य नाही त्या हिंदुत्ववाद्यांचा पहा किती जोर आहे की त्यांनी करकरेसारख्यांना परस्पर उडवले असे म्हणणे हा केवळ तर्कटाचा दहशतवाद आहे. आणि इतका जर हिंदुत्ववाद्यांचा धाक आहे तर मग अजूनही अफजल गुरूला फाशी का मिळत नाहीय ? आता कोणालाही पटेल की हिंदुत्ववाद्यांचा बागुलबुवा हा विकीलीक्स म्हणते त्याप्रमाणे एक धर्माचा खेळ करणे आहे. आणि हे आपण निर्भीड होत जाणले पाहिजे.
अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

1 टिप्पणी:

  1. १. खरे आहे. हिन्दुत्व ही आता राजकारणात हिन्दूंची मते खेचणारी नाहीतर मुसलमानांची मते खेचण्यासाठी वापरले जाणार. इस्लाम हा ज़सा हिन्दूंची मते खेचण्यासाठी वापरला गेला/जातो तसेच. त्यामुळे एकुणात धर्मवाद हाच शाप आहे, हेच जुने सत्य उगाळावे लागते. या भूलथापांचा परिणाम मतदार निवडणुकीत किती काळ परिणामकारक होऊ देणार आहेत? ही अफूची गोळी किती काळ गुंगी आणणार आहे? अल्लाह जाने!

    उत्तर द्याहटवा