निर्भीड-५
अमिताभ-सोनिया-काही घटना
सोनिया गांधी व राजीव गांधी यांचे प्रेम इटालीत जमले. तिथे राजीव गांधी विमान-चालकाचे प्रशिक्षण घेत होते. इंदिरा गांधींना भेटायला सोनियाजी पहिल्यांदा दिल्ली एअरपोर्टवर आल्या तेव्हा त्यांना घ्यायला खुद्द अमिताभ बच्चन गेले होते.
सोनियाजींच्या लग्नात नवरीला नटवणे तेजी बच्चनकडे होते. अमिताभचे जेव्हा चांगले बस्तान बसले तेव्हा त्याच्या पैशाचे व्यवहार त्याचा भाऊ अजिताभ बच्चन पाहू लागला. त्या काळी परदेशी चलनाचे नियम खूप काटेकोर होते. त्याला बगल देण्यासाटी अजिताभ व पत्नी रमोला एन आर आई झाले व लंडनला राहू लागले. अमिताभही त्या काळी युरोपात व परदेशी ठिकठिकाणी शोज करत असे.लंडनचा प्राप्तीकर चुकवण्यासाठी मग अजिताभ बहामाला राहू लागला.त्याने, हॉटेल, दुकाने व एक शिपिंग कंपनी काढली. ते सर्व नीट चालते तर तो ओनॅसिसची ( मिसेस केनेडीने नंतर ह्याच्याशी लग्न केले होते. ) तो बरोबरी करू शकला असता. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर राजीव पंतप्रधान झाल्यावर त्यांनी अमिताभला राजकारणात आणले. अमिताभ अलाहाबादहून दणदणित विजय मिळवून लोकसभेत बसला. तेंव्हाच्या अर्थमंत्र्यांनी, व्ही.पी.सिंग, फेरा कायद्याखाली बच्चन बंधूंवर कारवाई केली. राजीवचे न ऐकल्यामुळे व्ही.पी.सिंगाची संरक्षण मंत्री म्हणून बदली झाली. मग बोफोर्स प्रकरण लोकसभेत निघाले. अमिताभने लोकसभेतून पळ काढला. दोन वृत्तपत्रांनी बच्चन बंधूंनी बोफोर्स मध्ये राजीव ऐवजी पैसे घेतले असा आरोप केला होता.त्यांच्याविरुद्ध खटला ऊभारण्यासाठी राजीवजींनी सरकारचे लंडनस्थित वकील झरीवाला ह्यांना सांगितले. खटला चालू असताना सत्ताबदल होऊन व्ही.पी. पंतप्रधान झाले. त्यांनी झरीवालांना काढून टाकले. ते भारत सरकारचे सल्लागारही होते. त्यांचे खूप नुकसान झाले.राजीव गांधींनी मग एशिया ट्रस्ट मधून काही कोटी रुपये दिले. झरिवाला केस जिंकले पण अजिताभने त्यांची फीस दिली नाही व वर झरीवालांच्या पत्नीला फूस लावली, त्यांचा घटस्फोट झाला. अजिताभचाही घतस्फोट झाला. झरीवालांची नुस्ती फीसच त्याकाळी ७५ कोटी होती व ती त्यांना केस जिंकूनही मिळाली नाही. कालांतराने राजीवजींची हत्या झाली.
आता ह्या घटनांनंतर ओळखा अमिताभशी गांधी घराण्याचे वितुष्ट का आले व ते अजून का चालू आहे ?
अरूण अनंत भालेराव
भ्रमण: ९३२४६८२७९२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा