marathi blog vishva

शुक्रवार, १० फेब्रुवारी, २०१२




निर्भीड व्हा---३६
बाल कामगार--रैहान आणि मिराया वद्रा
    वरच्या फोटोत दिसताहेत ते आहेत १२ वर्षांचा रैहान वद्रा व १० वर्षाची मिराया वद्रा. ही आहेत प्रियांका गांधीं-वद्राची मुले. प्रियांका गांधी-वद्रा ह्या आहेत सोनिया गांधींची मुलगी आणि सोनिया गांधी होत्या राजीव गांधी ह्यांच्या पत्नी. आता राजीव गांधी हे इंदिरा गांधींचे पुत्र होते व इंदिरा गांधी ह्या जवाहरला नेहरू ह्यांची मुलगी होती हे तर लोकांना माहीतच असते.
    आजकाल निवडणुकीच्या सभांना प्रियांका वद्रा ह्या आपल्या दोन्ही मुलांना स्टेजवरही घेऊन जातात. अर्थात हेलिकॉप्टरने नेत असतात हे तर साहजिकच आहे. कोणाला वाटेल हे किती साहजिक व स्वाभाविक असे आहे. प्रियांका ही एक साधी गृहिणी आहे. बिचारी आपले घर व संसार सांभाळत असते. त्यात निवडणुकीच्या वेळेस भाऊ राहूल गांधी व आई सोनिया गांधी ह्यांना रायबरेली व अमेठी ह्या मतदारसंघात निवडणुकीच्या सभा घेत मदत करते. आता घर सांभाळता सांभाळता मुलांना कुठे ठेवील ? तर म्हणून त्यांनाही बरोबर घेऊन जाते. ह्यात तुम्हाला खास असे काय दिसते ?
    पहिल्यांदा डोळ्यात भरते ते प्रियांकाचे अगदी इंदिरा गांधीसारखे दिसणे व त्यासाठी केलेली खास केशरचना. आता हे काही केवळ एका नातीने आजीसारखे दिसावे ह्या साध्या उद्देशाने खासच नाहीय. मायावतीचे हत्तीचे पुतळे हे निवडणूक चिन्हासारखे दिसतात म्हणून निवडणूक आयोगाने ते झाकायला लावले ते कशामुळे ? तर दिसण्याचा मरातब व पगडा मतदारांवर पडून एखाद्यालाच त्याचा लाभ मिळू नये म्हणून. तर आता प्रियांकाने अगदी हुबेहुब इंदिरा गांधींसारखी केशरचना करून मतदारांवर इंप्रेशन पाडले की बघा मी त्यांचीच नात आहे असे दाखवत तर ते एकाच्याच सोयीचे होत नाही ?
    झाशीची राणी लक्षुमबाईचा अश्वारूढ पुतळा आठवा. उगारलेल्या तलवारीने तिचे जेव्हढे शौर्य दिसते, त्यापेक्षा ज्यास्त परिणामकारक आहे तिचे पाठीशी गुंडाळलेले तान्हे मूल. त्यामुळे ती कशी ज्यास्तच उठावदार होते. अगदी ह्याच कारणामुळे जर्मनीत असा एक कायदा आहे की तान्ह्या मुलांचे फोटो जाहीरातीसाठी वापरणे बेकादेशीर आहे. कारण काय तर पाहणार्‍यांच्या भावनांशी तुम्ही खेळता व आपला धंदा करून घेता, हे काही चांगले नाही. तुम्हाला जाहीरातच करायचीय तर मोठे ( वयाने ) कलाकार घ्या. त्यांच्या मार्फत तुमच्या उत्पादनाची जाहीरात करा. शिवाय मुलांना जाहिरातीत वा सिनेमात कामे करायला लावून त्यांचे बालपण हिरावून घेणारे आईबाप आपण पाहिलेलेच आहेत. ते तर वेठबिगार बाल-कामगारच होतात. ह्यामुळेच तर आजकाल बर्‍याच हॉटेलातून तुम्ही पाहिले असेल की बोर्ड लावलेले असतात की आम्ही बालमजदूर ठेवीत नाहीत. आता ह्या पार्श्वभूमीवर पहा, आपण वर्तमानपत्रात आलेला फोटो किती काळजीने पाहतो. बघू बघू कशी आहेत तिची मुले ? हा त्यांच्या बालपणाचा गैरवापरच आहे. कोणी तरी ह्याविरुद्ध निवडणूक आयोगाकडे तक्रारच करायला पाहिजे.
    साधी गोष्ट पहा . पाहणार्‍यांचे कुतुहूल कसे चाळवले जाते ते. ह्या पोरांची नावे आहेत: रैहान ( १२, मुलगा ) व मिराया ( १०, मुलगी ). आपल्याला नावांचेही कुतुहूलच वाटते. मग कोणी तरी माहीती काढते की रैहान हे अरेबियन नाव असून त्याचा अर्थ होतो, स्वर्गाचा सुवास. आणि मिराया हे हिंदू नाव असून कृष्णाची लाडकी मीरा हिचेच हे नाव आहे. आता हे एक प्रकारे लोकांना सांगणेच झाले की पहा आमच्या एका नातवाचे नाव मुस्लिम धाटणीचे आहे तर नातीचे नाव हिंदू वळणाचे आहे. निधर्मीपणा साक्षात दाखवण्याचा किती प्रभावी मार्ग आहे हा ! शिवाय प्रियांका हे हिंदू नाव, तिचे पती रॉबर्ट वद्रा हे ख्रिश्चन, तिचे सासरे हिंदू तर सासू ख्रिश्चन. ह्यात सोनिया ह्यांचा धर्म मिळवा म्हणजे धर्म-संकर काय असतो ते थेट कळेल. आम्ही मुसलमानांना ९ टक्के आरक्षण देऊ असे कायद्याने म्हणावे, पण बघा माझ्या नातवाचे नावही मी मुसलमानी वळणाचे ठेवले आहे ही अंतस्थ हेतूची तरकीब होते. आणि त्यात निष्पाप पोरांना नाहक वापरले जाते. म्हणूनच तर ते बाल-कामगार ठरतात. आणि त्यासाठी त्यांच्या आई-वडिलांना दोष द्यायला पाहिजे. अगदी निर्भीडपणे !
------------------------------------------------
अरूण अनंत भालेराव
-------------------------------------

Child-abuser Priyanka and Congress

-------------------------------------
    The children you see in the above photo are son and daughter of Priyanka-Gandhi-Vadra. You are aware that Priyanka is daughter of Soniya and Soniya is wife of Rajiv Gandhi, who was son of Indira Gandhi ,who was daughter of Jawaharlal Nehru, our first Prime Minister.
    Nowadays Priyanka Vadra takes alongwith her two children and puts them on the stage for the show. Raihan, 12, her son and Miraya who is 10 and is her daughter obviously get to ride in the helicopter and that must be their motivation to forgo school and studies and be present on the stage electioneering in Raybareily and Amethi. What about the motivation of Priyanka about carrying her children around. Don't get fooled by the show of a busy housewife scurrying her children with her, instead of keeping them with the baby-sitter or in a day-care. The obvious motivation is to play on the sentiments of the voters. That is why her studied hairstyle is so closely resembling Indira Gandhi. And this is no case of infatuation but a cunning master-stroke to garner the sympathies by playing the similarity of looks with Indira Gandhi. If Election Commissioner can ask Mayavati to wrap her elephants so that it provides equal level playing fields to all the candidates, then it is undue advantage to allow Priyanka to depict herself in the style of Indira Gandhi. Exactly for the same reason for which one cannot use govt. machinery so that voter should not get unduly impressed with the party-in-power , it is for the same reason we should prevent Priyanka from reminding voters that she is grand-daughter of Indira Gandhi by looking like her.
    If you ever look at the statue of Laxmibai, the queen of Jhansi, look more closely at the child she has wrapped on her back. The bravery that she demonstrates by her raised sword on the horseback gets amplified many times more by this wrapped child. Exactly for this reason, there is a law enacted in Germany that children are banned in the commercial advertisements. When we see children, we get easily carried away by their innocent faces. And this is an undue advantage for the few who are using children for selling their products. This is disallowed for the same reason for which children are debarred from working in factories and selling goods. If you have observed closely, nowadays most of the hotels are displaying billboards stating that they don't employ child labour. We know that many parents rob the children of their pleasant childhood when they work in advertisements and films or in any job. On this background Priyanka using her children to ask for votes is nothing short of child-abuse and it is worth complaing about the same with the Election Commissioner.
    Just see how the simple thing like names of these children is used to the advantage of Congress. The 12 yr old son is named Raihan, which is said to be an Arabian name, meaning "Sweet smell of Heaven" and the 10 yr old daughter is named Miraya which is a Hindu name of Meera the devotee of Lord Krishna. This is the most emphatic use of children's names to convince the voters that Congress is so secular that the grandson is named in Arabian tradition, appeasing the Muslim votes. And for Hindu voters there is always the grand-daughter Miraya. If you don't succeed in appeasing Muslims through the 9% reservation that Election Commission has turned down, you can always win by the sentimental way of putting Raihan on the stage and proclaim the same appeasement. This is nothing short of Child-abuse !

-----------------------------------------------------------------------------------------------------------------
Arun Anant Bhalerao
--------------------------------------------------------------------------------------------------