निर्भीड--
अमर्याद परशुराम !
कोणी तरी टोचले की ज्या समाजाचा आद्य पुरुष परशुराम आहे, त्यांना अहिंसेबद्दल बोलायचा काही अधिकार नाही. परशुरामाने २१ वेळा पृथ्वी नि:क्षत्रीय केली होती, एवढीच मला माहीती होती. त्यामुळे एक अपराधीपण आले. खरे तर आमच्या वडिलांनी ब्राह्मण्याच्या कुठल्याच लौकिक खुणा आम्हाला कधी दाखवल्या नाही. आमच्या कोणाच्या मुंजी झाल्या नाहीत. एका भावाने मराठा मुलीशी लग्न केले, आणि कुठलेच धार्मिक विधी आम्ही कधी केले नाहीत. वडिलांचे वा आईचे श्राद्धही आम्ही केले नाही. तरीही आम्ही ब्राह्मण आहोत असे कोणी म्हणाले तर ते लागतेच. त्यात मला तर ह्या आद्य पुरुषाविषयीही फारशी माहीती नाही. कोण होते परशुराम ?
विनोबा भावेंच्या शब्दात ( विनोबा सारस्वत--सं: राम शेवाळकर, साहित्य अकादेमी प्रकाशन ) हा त्या काळचा सर्वोत्तम पुरुषार्थी माणूस होता. आई क्षत्रीय तर बाप ब्राह्मण. हा भयंकर पितृभक्त होता. बापाच्या आज्ञेने ह्याने आईचे डोकेच उडविले. त्याकाळच्या क्षत्रीयांचा अत्याचार सहन न होऊन ह्याने २१ वेळा युद्ध करून पृथ्वी नि:क्षत्रीय केली होती. तरीही क्षत्रीय राहिलेच. मग ह्याने अरण्ये तोडून कोकणात वस्ती केली व लोकांना चांगले विचार, आचार व उच्चार शिकविले व तुम्ही ब्राह्मण झालात असे घोषित केले. परशुराम रामभक्त होता. रामाच्या भेटीच्या वेळी राम झाडाला पाणी घालत होता त्यावरून त्याला झाडे कुर्हाडीने तोडण्याऐवजी झाडे लावणे हे महत्वाचे आहे हा बोध झाला व नंतर त्याने वनस्पतीशास्त्राचा सखोल अभ्यास केला. त्याने शोधलेल्या अवजाराला "नव परशु" असे म्हणतात व कोकणात जी फळझाडे जोपासलेली आहेत त्याचे कारणही त्याचा हा अभ्यासच असावा. आईचे डोके उडविणारा, पृथ्वी नि:क्षत्रीय करणारा हा परशुराम शेवटी शेवटी आपल्या जीवनाचे सार समुद्रासारखे प्रवृत्तींची मर्यादा हेच आहे असे म्हणतो व केलेल्या हिंसेची उपरती दाखवतो. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राचा भक्त असलेला हा परशुराम शेवटी संदेश देतो की "ॐ नमो भगवत्यै मर्यादायै".
स्खलन झाल्यावर त्यातून शिकणे व सावरणे ह्याला खूपच मोठेपणा लागतो व म्हणूनच ब्राह्मण समाजाने अजूनही परशुरामाला आपले आद्यपुरुष म्हणून मानले असेल. ह्याच न्यायाने परशुरामाला, किंवा ब्राह्मणांना आता अहिंसेबद्दल बोलायला काहीच हरकत नसावी.
अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com
Without Fear or Favour
UnLimited Parshuram !
The other day someone teased me on my blog saying that those whose Founder is Parshuram should not talk about Non-Violence. Though the comment unsettled me, it shamed me that I even did not know enough about the Founder of Brahmins ( especially Kokanastha Brahmins) the God Parshuram. Though I know that I am Brahmin, I was not raised amongst Brahministic rituals etc. For example , none of we brothers had a thread ceremony and one of us married a non-brahmin girl. This prompted me to know more about Lord Parshuram. ( I only knew that he had attempted to kill all the Kshatreeyas on the world, 21 times ! )
Vinoba Bhave was a modern day saint more famously known for Bhoodan-Yadnya, a campaigne inviting people to donate excess farm land to the farmless and thus attempt socialism in practice. He has described Lord Parshuram in book "Vinoba Saraswat--edited by Ram Shevalkar and published by Sahitya Academy".: His mother was Kshatriya and father was a Brahmin. He was a devotee of his father and adored him so much that when he ordered him to kill his mother he beheaded her. No doubt, he was so violent. He also was a rebel and detested wrongdoings of then Kshatriya rulers. So he vowed to anihilate all Kshatriyas from the earth and led 21 campaignes to kill all of them. Later he became devotee of Lord Raam, who is epitome of Self-Control. After defeating Kshatriyas, he wanted to create a special colony of people in Konkan , which was a jungle then. With his famous weapon, the Axe, he deforested konkan extensively and rehabilitated the victims there. He taught them good values and the scriptures and declared all these people as Brahmins. When he met Lord Raam, he observed that while talking to him Lord Raam was watering and tending a plant. This created an awareness in him for taking care of the plants and environment. He studied plants and invented a tool "Nav Parashu" after him. After such extreme measures undertaken in his life he realised the wisdom of self control and gave a message to his people that we should be like a sea, which does not cross its given limits. This message he gave through a mantra "Oum namo bhagawate maryadayye", meaning honour the limits or self control or don't go to extremes.
Having committed lot of violence, Lord Parshuram realised the value of non-violence and virtues of self control. It requires lot of guts and courage to experiment, realise the wrong and correct the behaviour and it may be because of this rare quality that he is still considered the Founder of Brahmins .
Arun Anant Bhalerao
arunbhalerao67@gmail.com
गुरुवार, १८ नोव्हेंबर, २०१०
बुधवार, १७ नोव्हेंबर, २०१०
निर्भीड--
अमर्याद परशुराम !
कोणी तरी टोचले की ज्या समाजाचा आद्य पुरुष परशुराम आहे, त्यांना अहिंसेबद्दल बोलायचा काही अधिकार नाही. परशुरामाने २१ वेळा पृथ्वी नि:क्षत्रीय केली होती, एवढीच मला माहीती होती. त्यामुळे एक अपराधीपण आले. खरे तर आमच्या वडिलांनी ब्राह्मण्याच्या कुठल्याच लौकिक खुणा आम्हाला कधी दाखवल्या नाही. आमच्या कोणाच्या मुंजी झाल्या नाहीत. एका भावाने मराठा मुलीशी लग्न केले, आणि कुठलेच धार्मिक विधी आम्ही कधी केले नाहीत. वडिलांचे वा आईचे श्राद्धही आम्ही केले नाही. तरीही आम्ही ब्राह्मण आहोत असे कोणी म्हणाले तर ते लागतेच. त्यात मला तर ह्या आद्य पुरुषाविषयीही फारशी माहीती नाही. कोण होते परशुराम ?
विनोबा भावेंच्या शब्दात ( विनोबा सारस्वत--सं: राम शेवाळकर, साहित्य अकादेमी प्रकाशन ) हा त्या काळचा सर्वोत्तम पुरुषार्थी माणूस होता. आई क्षत्रीय तर बाप ब्राह्मण. हा भयंकर पितृभक्त होता. बापाच्या आज्ञेने ह्याने आईचे डोकेच उडविले. त्याकाळच्या क्षत्रीयांचा अत्याचार सहन न होऊन ह्याने २१ वेळा युद्ध करून पृथ्वी नि:क्षत्रीय केली होती. तरीही क्षत्रीय राहिलेच. मग ह्याने अरण्ये तोडून कोकणात वस्ती केली व लोकांना चांगले विचार, आचार व उच्चार शिकविले व तुम्ही ब्राह्मण झालात असे घोषित केले. परशुराम रामभक्त होता. रामाच्या भेटीच्या वेळी राम झाडाला पाणी घालत होता त्यावरून त्याला झाडे कुर्हाडीने तोडण्याऐवजी झाडे लावणे हे महत्वाचे आहे हा बोध झाला व नंतर त्याने वनस्पतीशास्त्राचा सखोल अभ्यास केला. त्याने शोधलेल्या अवजाराला "नव परशु" असे म्हणतात व कोकणात जी फळझाडे जोपासलेली आहेत त्याचे कारणही त्याचा हा अभ्यासच असावा. आईचे डोके उडविणारा, पृथ्वी नि:क्षत्रीय करणारा हा परशुराम शेवटी शेवटी आपल्या जीवनाचे सार समुद्रासारखे प्रवृत्तींची मर्यादा हेच आहे असे म्हणतो व केलेल्या हिंसेची उपरती दाखवतो. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राचा भक्त असलेला हा परशुराम शेवटी संदेश देतो की "ॐ नमो भगवत्यै मर्यादायै".
स्खलन झाल्यावर त्यातून शिकणे व सावरणे ह्याला खूपच मोठेपणा लागतो व म्हणूनच ब्राह्मण समाजाने अजूनही परशुरामाला आपले आद्यपुरुष म्हणून मानले असेल. ह्याच न्यायाने परशुरामाला, किंवा ब्राह्मणांना आता अहिंसेबद्दल बोलायला काहीच हरकत नसावी.
अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com
अमर्याद परशुराम !
कोणी तरी टोचले की ज्या समाजाचा आद्य पुरुष परशुराम आहे, त्यांना अहिंसेबद्दल बोलायचा काही अधिकार नाही. परशुरामाने २१ वेळा पृथ्वी नि:क्षत्रीय केली होती, एवढीच मला माहीती होती. त्यामुळे एक अपराधीपण आले. खरे तर आमच्या वडिलांनी ब्राह्मण्याच्या कुठल्याच लौकिक खुणा आम्हाला कधी दाखवल्या नाही. आमच्या कोणाच्या मुंजी झाल्या नाहीत. एका भावाने मराठा मुलीशी लग्न केले, आणि कुठलेच धार्मिक विधी आम्ही कधी केले नाहीत. वडिलांचे वा आईचे श्राद्धही आम्ही केले नाही. तरीही आम्ही ब्राह्मण आहोत असे कोणी म्हणाले तर ते लागतेच. त्यात मला तर ह्या आद्य पुरुषाविषयीही फारशी माहीती नाही. कोण होते परशुराम ?
विनोबा भावेंच्या शब्दात ( विनोबा सारस्वत--सं: राम शेवाळकर, साहित्य अकादेमी प्रकाशन ) हा त्या काळचा सर्वोत्तम पुरुषार्थी माणूस होता. आई क्षत्रीय तर बाप ब्राह्मण. हा भयंकर पितृभक्त होता. बापाच्या आज्ञेने ह्याने आईचे डोकेच उडविले. त्याकाळच्या क्षत्रीयांचा अत्याचार सहन न होऊन ह्याने २१ वेळा युद्ध करून पृथ्वी नि:क्षत्रीय केली होती. तरीही क्षत्रीय राहिलेच. मग ह्याने अरण्ये तोडून कोकणात वस्ती केली व लोकांना चांगले विचार, आचार व उच्चार शिकविले व तुम्ही ब्राह्मण झालात असे घोषित केले. परशुराम रामभक्त होता. रामाच्या भेटीच्या वेळी राम झाडाला पाणी घालत होता त्यावरून त्याला झाडे कुर्हाडीने तोडण्याऐवजी झाडे लावणे हे महत्वाचे आहे हा बोध झाला व नंतर त्याने वनस्पतीशास्त्राचा सखोल अभ्यास केला. त्याने शोधलेल्या अवजाराला "नव परशु" असे म्हणतात व कोकणात जी फळझाडे जोपासलेली आहेत त्याचे कारणही त्याचा हा अभ्यासच असावा. आईचे डोके उडविणारा, पृथ्वी नि:क्षत्रीय करणारा हा परशुराम शेवटी शेवटी आपल्या जीवनाचे सार समुद्रासारखे प्रवृत्तींची मर्यादा हेच आहे असे म्हणतो व केलेल्या हिंसेची उपरती दाखवतो. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राचा भक्त असलेला हा परशुराम शेवटी संदेश देतो की "ॐ नमो भगवत्यै मर्यादायै".
स्खलन झाल्यावर त्यातून शिकणे व सावरणे ह्याला खूपच मोठेपणा लागतो व म्हणूनच ब्राह्मण समाजाने अजूनही परशुरामाला आपले आद्यपुरुष म्हणून मानले असेल. ह्याच न्यायाने परशुरामाला, किंवा ब्राह्मणांना आता अहिंसेबद्दल बोलायला काहीच हरकत नसावी.
अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)